राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

कोपरगाव विजय कापसे दि ३१ डिसेंबर २०२५ : दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर येथे घेण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धांमधून महाराष्ट्राचा संघ घोषित करण्यात येवून महाराष्ट्राच्या संघामध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या पाच खेळाडूंची निवड आली होती. दिनांक २२ ते २८ डिसेंबर२०२५ या दरम्यान राष्ट्रीय हॉकी स्पर्धा मध्यप्रदेश टिकमगड येथे पार पडल्या. यामध्ये विशेष बाब म्हणजे गौतम पब्लिक स्कूलचा खेळाडू कुमार कृष्णा सातपुते याने महाराष्ट्र हॉकी संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावली अशी माहिती गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.तसेच श्रेयश गाडेकर, प्रणव लोंढे, रणवीर नागलोट, लोकेश पाटील या पाच खेळाडूंनी महाराष्ट्र संघामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून गौतम पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. महाराष्ट्राच्या संघाने राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्या पर्यंत मजल गाठली. उपांत्य पूर्व सामन्यांमध्ये महाराष्ट्र संघाचा ओडिसा संघाशी मुकाबला होवून त्यामध्ये महाराष्ट्र संघाचा २/१ ने निसटता पराभव झाला.

गौतम पब्लिक स्कूलच्या या पाचही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल या सर्व खेळाडूंचे व त्यांचे हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे यांचे संस्थेचे चेअरमन मा.आ. अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य व विश्वस्त तसेच निरीक्षक नारायण बारे, प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंना प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली, क्रीडा विभाग प्रमुख सुधाकर निलख, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.




