जिल्हास्तरीय आदर्श गणित अध्यापक पुरस्काराने शिरसाळे यांचा गौरव

जिल्हास्तरीय आदर्श गणित अध्यापक पुरस्काराने शिरसाळे यांचा गौरव
जिल्हास्तरीय आदर्श गणित अध्यापक पुरस्काराने शिरसाळे यांचा गौरव

Kopargaon vijay kapse दि १९ जुलै २०२६ : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ सलग्न अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगाव येथील गणित विषयाचे शिक्षक सुरेंद्र नारायण शिरसाळे यांना “जिल्हास्तरीय आदर्श गणित अध्यापक पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, प्रभावी शालेय नेतृत्व, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे माजी कुलगुरू तथा लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाचे राज्याध्यक्ष संजयकुमार निक्राड, अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष घुगे सर, शिक्षण निरीक्षक श्रीराम थोरात तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. या उल्लेखनीय यशाबद्दल कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलासभाऊ ठोळे, चेअरमन चंद्रकांत शेठ ठोळे, सचिव दिलीपभाऊ अजमेरे, सहसचिव सचिनभाऊ अजमेरे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, आनंद ठोळे, संदीप अजमेरे व राजेश ठोळे यांनी श्री. शिरसाळे यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनीही त्यांना शुभेच्छा देत पुढील शैक्षणिक कार्यासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

श्री. सुरेंद्र शिरसाळे यांना प्राप्त झालेला हा पुरस्कार श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा, उत्कृष्ट कार्याचा आणि शिक्षकांच्या समर्पित योगदानाचा सन्मान मानला जात आहे.



