आपला जिल्हा

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये संयुक्त भक्ती संगीत उपक्रम उत्साहात संपन्न

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये संयुक्त भक्ती संगीत उपक्रम उत्साहात संपन्न

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये संयुक्त भक्ती संगीत उपक्रम उत्साहात संपन्न

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २० जुलै २०२६अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विश्वस्त  शरयू देशमुख यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘अॅप्रोच’ उपक्रमांतर्गत अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये संयुक्त भक्ती संगीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमाचा उद्देश विविध शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये मैत्री, सहकार्य, विचारांची देवाणघेवाण तसेच सांस्कृतिक जाणीव निर्माण करणे हा आहे. गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या प्राथमिक विभागासह अंभोरे, पिपरणे, देवगाव, जाखुरी आणि वस्ती शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

जाहिरात

कार्यक्रमात सांदिपनी गुरुकुल विद्यालय, घुलेवाडी येथील विद्यार्थ्यांनी विविध भक्तीगीते, अभंग, भजने आणि सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांना भक्तिरसात रंगविले. ‘रडू नको बाळा, मी पाण्याला जाते’ या गीतावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त ठेका धरत आनंद व्यक्त केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच संगीताची आवड, आत्मविश्वास, समूहभावना आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी शाळांतील शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले.

जाहिरात

कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, विस्तार अधिकारी श्रीमती कलगुंडे, केंद्रप्रमुख सौ. बाले मॅडम व राजेंद्र अनाप तसेच सर्व शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा  दुर्गा तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, डायरेक्टर अकॅडेमीक डॉ. जे. बी. गुरव, शाळेचे प्राचार्य आशिष कुमार तसेच सर्व विभागप्रमुख व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे