आपला जिल्हा

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अदितीने यश संपादन केले – माजी संचालक मधुकर वक्ते

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अदितीने यश संपादन केले – माजी संचालक मधुकर वक्ते

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अदितीने यश संपादन केले – माजी संचालक मधुकर वक्ते

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२५ग्रामीण भागातील मुलींनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या जोरावर आपले ध्येय पूर्ण करता येत असते, मुलींमध्ये जिद्द आणि मेहनत करण्याची आवड असेल तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक मधुकर वक्ते यांनी आदिती सुरेश शिंदे ही नुकतीच वैदकीय एमबीबीएस पदवी प्राप्त केली त्याबद्दल जेऊर कुंभारी ग्रामस्थ व जेऊरचा राजा मित्र मंडळ यांच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी बोलत होते.

जाहिरात

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक सतिषराव आव्हाड , ज्ञानेश्वर सांगळे, रेवजी आव्हाड, विठ्ठलराव आव्हाड, रमेश वक्ते, विजय रोहम होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले.

जाहिरात

याप्रसंगी सत्कारमूर्ती आदिती सुरेश शिंदे, पाराजी शिंदे, चंद्रभागाबाई शिंदे, सुरेश शिंदे, ज्योती शिंदे, यांचा सत्कार हनुमंतराव भोंगळे, मधुकर वक्ते, रेवजी आव्हाड, मनीषा आव्हाड, वैशाली आव्हाड यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुला-मुलींना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध होत असते. तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी आपले जीवन उज्वल करू शकतात.

जाहिरात

सत्कारमूर्ती आदिती शिंदे हिने सांगितले की, आज जो सत्कार झाला हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. मी डॉक्टर होण्यासाठी माझे वडील – आई, आजी- आजोबा, काक- काकू यांचे मोठे योगदान आहे ते माझे प्रेरणास्थान आहे व माझ्या यशाचे श्रेय माझ्या कुटुंबांना देत. यावेळी काँग्रेस सरचिटणीस नितीन शिंदे ,निरंजन रोहम ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जालिंदर चव्हाण, माजी उपसरपंच यशवंतराव आव्हाड, कल्याणराव गुरसळ, महेंद्र वक्ते, पांडूरंग वक्ते, कैलास वक्ते ,शिवाजी वक्ते, श्याम आव्हाड, संभाजी रोहम, पोपट शिंदे, सोन्याबापू ,प्रा.मधुकर वक्ते, नितीन इंगळे, फकिरा दहाटे, धनंजय रोहम,शिंदे संतोष ,शिंदे सुधीर, शिंदे आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव आव्हाड यांनी केले व उपस्थितांचे आभार विजय रोमह यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे