टपरी धारकांना कायमस्वरूपी पक्के गाळे मिळावे- सचिन आसणे
टपरी धारकांना कायमस्वरूपी पक्के गाळे मिळावे- सचिन आसणे
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि ५ मार्च २०२५– कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील छोटे-मोठे व्यवसाय करत असलेल्या टपरी धारकांना कायमस्वरूपी हक्काचे गाळे मिळावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर विभाग प्रमुख सचिन आसणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
जाहिरात
या पत्रकात आसणे यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागाच्या दृष्टीने तालुक्यातील ब्राह्मणगावची बाजारपेठ मोठी असून गावात मोठ्या प्रमाणात लहान मोठे व्यवसाय करणारे अनेक टपरीधारक आहे या सर्व टपरीधारकांना प्रशासनाच्या वतीने काही शासकीय योजनेद्वारे गावातच आहे त्या जागेवर कायमस्वरूपी आवश्यकतेनुसार पक्के गाळे उभे करून दिले तर गावाच्या विकासात भर पडेलच शिवाय त्या टपरी धारकांना देखील पक्के सुसज्ज सुशोभित असे गाळे मिळेल जेणेकरून त्यांचा व्यवसाय देखील भरभराटीस येऊ शकेल त्याशिवाय गावातील सुशिक्षित बेरोजगार युवक देखील छोटा मोठा व्यवसाय सुरू करत आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत गावातच विकसित होऊ शकेल त्यामुळे प्रशासनाने गावातील व्यवसायिकांना कायमस्वरूपी पक्या गाळ्याची निर्मिती करून द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर विभाग प्रमुख सचिन आसणे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.जाहिरातजाहिरातसचिन आसने