आत्मा मालिक हॉस्पिटल

आत्मा मालिक गुरुकुल येवल्याचे आत्माविष्कार स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक समारंभ  उत्साहात संपन्न

आत्मा मालिक गुरुकुल येवल्याचे आत्माविष्कार स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक समारंभ  उत्साहात संपन्न
आत्मा मालिक गुरुकुल येवल्याचे आत्माविष्कार स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक समारंभ  उत्साहात संपन्न
जाहिरात आत्मा

येवला विजय कापसे दि ९ मार्च २०२५येवला येथील आत्मा मालिक गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल चे आत्माविष्कार स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक समारंभ सरचिटणीस विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण व अध्यक्ष पुरणगाव व येवला गुरुकुल हनुमंत भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जाहिरात
    याप्रसंगी प्रमुख पाहुणे  म्हणून आंतरराष्ट्रीय कीड रोग तज्ञ चेअरमन अश्वमेध ग्रुप डॉ ज्ञानेश्वर वाकचौरे, येवला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर,तहसीलदार आबा महाजन, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, येवला पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, धीरज महाजन, पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, संस्थेचे विश्वस्त हरिभाऊ गिरमे, हेमंत शाह, चरणदास महाराज, सेवादास महाराज,  निरंजन डांगे, योगेश सोनवणे ,नेहा शाह, गुरुकुलचे प्राचार्य तुषार कापसे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत प्रतिमा पूजन होऊन सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली.तसेच गुरुकुल मधील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली होती. इयत्ता नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. मागील वर्षी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल लागला, त्यात  समीक्षा थळकर, रोशनी कोतवाल, श्रेयश नागपुरे, पायल थळकर, या एक ते तीन मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

जाहिरात
 स्कॉलरशिप परीक्षेत प्रावीन्य मिळालेल्या पाचवी मधील आर्यन ठोंबरे अथर्व कुमकर, आठवी मधील मयुरी मगर, सृष्टी घोडके, अश्विन कुमकर, सुयश भोरकडे या  विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत सेकंड लेव्हल साठी कॉलिफिड झालेल्या इयत्ता तिसरी व सातवीच्या विद्यार्थ्यांचा तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रारंभिक गायन स्पर्धेत आत्मा मालिक गुरुकुलच्या सहावी ते नववीच्या १९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
 या सोहळ्यात इंग्लिश मिडीयम गुरुकुल मधील नर्सरी ते नववी पर्यंतच्या सर्वच   विद्यार्थ्यांनी आत्माविष्कार सोहळ्यामध्ये म्हणजेच डान्समध्ये सहभाग घेतलेला होता. त्यात आत्म्याचे गाणं ,श्रीकृष्ण थीम, त्यात देवकी वासुदेवांच्या लग्नापासून कंस ची दहशत कृष्णजन्म तसेच पुतनाचा वध हे सर्व जिवंत दृश्य दाखविण्यात आले. तात्या टोपे व झाशीची राणी थीम  असे डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य सादर केले.तसेच गुरुकुलाच्या महिला पालकांनी कान्हा सो जा जरा गाण्यात सहभाग घेतलेला होता.गुरुकुलाच्या शिक्षिकांनीही मराठी अस्मितेचा मान राखत माय मराठी गाण्यावर नृत्य सादर केले.
   प्रमुख पाहुणे डॉक्टर ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आत्मा मालिक गुरुकुल ही फक्त स्कूल नसून हे एक गुरुकुल आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात आणि ह्या संस्काराचे धडे आज गुरुकुलच्या धार्मिक, अध्यात्मिक आणि चैतन्यमयी वातावरणात घडत असल्याने भविष्यात हेच एक विद्यापीठ बनेल यात शंका नाही . तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी अध्यक्ष खुप लक्ष देत असून, प्राचार्य हे विद्यार्थी घडविण्यासाठी आणि शिक्षकही अहोरात्र प्रयत्न करत आहे.गुरुकुलाची सुरुवात ही ध्यानाने होते हाच गुरुदेवांचा सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद असल्याचे सांगितले.
 आत्मा मालिक गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.मुलांवर संस्कार घडवण्यासाठी शिक्षकांचा आणि पालकांचा मोलाचा सहभाग  लागतो आणि तोच सहवास या विद्यार्थ्यांना लाभल्यामुळे गुरुकुलाचे विद्यार्थी हे संस्कारी बनले आहे असे सांगितले.गुरुकुलाची सुरुवात २००३ साली अवघ्या ७ विद्यार्थ्यांपासून झालेली होती आज २०२५ या साली एकूण नर्सरी ते दहावी ५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. बाबांचा खूप मोठा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे.सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
आत्माविष्कार स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन अनुराधा जोरी व वैष्णवी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  प्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे