आपला जिल्हा

शासकीय शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे घवघवीत यश

शासकीय शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे घवघवीत यश

सुरेगाव-कोळपेवाडी येथील विद्यालयाच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Kopargaon vijay kapse दि ८ ऑक्टोबर २०२६/रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सुरेगाव-कोळपेवाडी येथील विद्यार्थ्यांनी कोपरगाव तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या यशात भर घातली.

जाहिरात

१४ वर्षे वयोगटात ओमकार शिंदे याने १०० मीटर धावण्यात प्रथम, लांब उडीत द्वितीय व २०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. ललित कोळपे याने २०० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. ओमकार शिंदे, ललित कोळपे, समर्थ काळे व वेदांत नवघरे यांच्या ४×१०० मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक मिळविला. समर्थ काळे याने ८० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय, तर प्रणव परसय्या याने लांब उडीत तृतीय क्रमांक मिळविला.

जाहिरात

१७ वर्षे वयोगटात युवराज ढोमसे याने २०० मीटरमध्ये प्रथम, ११० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय व १०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. शर्विल धोंड याने लांब उडीत, आदित्य कोळपे याने थाळीफेकीत आणि शंतनू निकम याने गोळाफेकीत प्रथम क्रमांक मिळविला. ओम हाळणोर याने १५०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

१९ वर्षे वयोगटात आर्यन गोरे याने १५०० मीटरमध्ये द्वितीय, महेश शिंदे याने लांब उडीत तृतीय, तर आदित्य साबळे याने ३००० मीटरमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.

जाहिरात

या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर विद्यालयातील सुवर्ण व रौप्यपदक विजेत्या खेळाडूंची प्रवरानगर-लोणी येथे होणाऱ्या अहिल्यानगर जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दरम्यान, चैतन्य खाडे याने पुणे विभागीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. समर्थ सोमासे याने बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून अहिल्यानगर जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. आयुष गवांदे याने कोपरगाव येथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय बुद्धिमत्ता स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.

खो-खो स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील विद्यालयाचा संघ कोपरगाव तालुक्यात उपविजेता ठरला. तर १४ वर्षे वयोगटातील संघानेही आश्वासक व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या सर्व यशाबद्दल विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करण्यात आले. खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख श्री. विठ्ठल वसावे, क्रीडा मार्गदर्शक श्री. देवेंद्र भोये, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष व क्रीडा मार्गदर्शक श्री. नितीन निकम तसेच कनिष्ठ महाविद्यालय विभागाचे क्रीडा मार्गदर्शक व प्रमुख श्री. बाबासाहेब आभाळे यांचे मार्गदर्शन लाभले. श्री. प्रशांत साबदे, श्री. मोरे व सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. पर्यवेक्षक श्री. सच्चिदानंद झावरे, उपमुख्याध्यापक श्री. देविदास माने व प्राचार्य श्री. प्रकाश चौरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव तालुक्याचे आमदार तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री. आशुतोष अशोकराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणजी चंद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू पिराजी कोळपे पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वाल्मीक आप्पा कोळपे, शालेय स्कूल कमिटी सदस्य हेमंत वाबळे तसेच पंचक्रोशीतील पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे