साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने निवारा- सुभद्रानगर येथील भूषणाचा सन्मान
साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने निवारा- सुभद्रानगर येथील भूषणाचा सन्मान
साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने निवारा- सुभद्रानगर येथील भूषणाचा सन्मान

कोपरगाव विजय कापसे दि २ एप्रिल २०२५– कोपरगाव शहरातील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या निवारा सुभद्रा नगर मधील लोकप्रिय माजी नगरसेवक जनार्दन कदम व साई निवारा मित्र मंडळ यांच्या वतीने निवारा सुभद्रा नगर येथील विविध क्षेत्रात यशस्वी झालेले व कार्य करत असलेल्या सुभद्रा नगरच्या सर्व भूषणाचा सुरेगाव येथील महंत गोवर्धनगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते माजी कर्तव्यदक्ष नगरसेवक जनार्दन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि १ एप्रिल रोजी सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी देविदास झाल्टे यांची रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या शाखेत प्राचार्य पदी नेमणूक, काशिनाथ लाव्हाटे यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कोपरगाव येथे मुख्याध्यापक पदी नेमणूक, प्राध्यापक नितीन साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यव कडून पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल, सुरेशराव बोळीज यांची रयत शिक्षण संस्था सातारा या शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबर पदी नेमणूक झाल्याबद्दल, विष्णू हाडके सेवानिवृत्त अधिकारी अकाउंटंट नगरपरिषद येवला यांचा वाढदिसानिमित्त, सुनील तारू यांची सहाय्यक फौजदार पदी नेमणूक झाल्याबद्दल, कर्मवीर भाऊराव पाटील माध्य. व तांत्रिक विद्यालयाचे माजी प्रभारी मुख्याध्यापक व गुरुकुल प्रमुख शहाजी सातव यांची पांगरी या ठिकाणी पर्यवेक्षकपदी नेमणूक झाल्याबद्दल, सार्थक किशोर कुलकर्णी यांची अंतर विद्यालय क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल या सुभद्रा नगरचे भूषण असलेल्या मान्यवरांचा सनशाइन टॉवर सुभद्रानगर येथे सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे माजी कर्तव्यदक्ष नगरसेवक जनार्दन कदम, रामनाथ आव्हाड, सतीश जाधव, सतीश गर्जे, माधवराव पोटे, अनिल जगताप, सुरेश नेरे, राजेंद्र जैन, सुमित भोंगळे, विष्णुपंत गायकवाड, पवार सर, वाघ सर, होन सर, सिद्धार्थ पाटणकर, संतोष बैरागी, दशरथ सर्वान, सोहम सातपुते, प्रथमेश सोनवणे, कृष्णा गवारे, ओम उदावंत, अक्षय ठाणगे, अजित इनामके आदी उपस्थित होते.

माजी नगरसेवक जनार्दन कदम हे नगरसेवक होण्यापूर्वी देखील सामाजिक कार्यात अग्रेसर होते त्यांनी सातत्याने परिसरातील जनतेची सेवा केली त्याचबरोबर शहरातील नागरिकांच्या समस्या देखील सोडविल्या तसेच कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधितांच्या कुटुंबासाठी धावून गेले महिलांच्या प्रती असलेला आदर दाखवून त्यांच्यासाठी विविध आरोग्य शिबिरेआयोजित करून वेगवेगळ्या स्पर्धा महिलांसाठी घेतल्या त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वच परिसरामध्ये आपल्याच घरातील असलेला हा जीवाभावाचा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली असुन भविष्यात प्रभागासह संपूर्ण कोपरगाव शहराची सेवा आपल्या हातून होणार असल्याचे शुभाशीर्वाद कदम यांना गोवर्धन महाराजांनी देत सर्व सुभद्रानगरच्या सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या तर माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी राबविलेल्या उवक्रमाचे कौतुक केले.




