साईगाव पालखीच्या भाविकांना शिर्डी वरून कोपरगावला यायला वाहनांची सुसज्ज व्यवस्था
साईगाव पालखीच्या भाविकांना शिर्डी वरून कोपरगावला यायला वाहनांची सुसज्ज व्यवस्था
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २ एप्रिल २०२५– जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी हे साईबाबांचे देवस्थान असून श्री राम नवमीला शिर्डीमध्ये लाखो भाविक दर्शनाला येत असतात याच अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित साई गाव पालखी द्वारे कोपरगाव तालुक्यातील हजारो भाविक रामनवमीनिमित्त शिर्डीला पायी जात असतात यावेळी संपूर्ण कोपरगाव शिर्डी साई पालखी महामार्ग साई भक्तांनी फुलून गेलेला असतो.
जाहिरात
सालाबाद प्रमाणे याही वर्षी रविवार दि २ एप्रिल २०२५ रोजी असलेल्या रामनवमीनिमित्त मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित साईगाव पालखीने हजारो भाविक कोपरगाव वरून श्री साईबाबांच्या दर्शनाला शिर्डी येथे जाणार असून या भाविकांना शिर्डी वरून परत कोपरगावला येण्यासाठी मोठया प्रमाणात वाहनांची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुंबादेवी तरुण मंडळ आयोजित साईगाव पालखीच्या आयोजकांनी दिली आहे.जाहिरात आत्मा
या वाहन व्यवस्थेकरिता सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, समता नागरी पतसंस्थेचे काका कोयटे, कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कोपरगाव वाहतूक चालक-मालक संघटनेचे रॉकी फर्नांडिस, कोपरगाव एसटी आगार व्यवस्थापक अमोल बनकर, निरीक्षक अविनाश गायकवाड आदीं सह संपूर्ण साई भक्त कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.जाहिरात
रामनवमीच्या दिवशी शिर्डी वरून कोपरगावला परत येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी पोलीस स्टेशन जवळ वाहनांची व्यवस्था रात्री १० पासून ते पहाटे पर्यंत करण्यात आली असून या कामी कोणा अजून कोणाला वाहन व्यवस्था पुरवायची असेल किंवा शिर्डी मध्ये भाविकांना काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी ओम बागुल ७५०७४१७०२०, कुणाल लोणारी ८७९३५३२६२८, निखिल जोशी ८४८४८६७०६३, मयूर खंडांगळे ९६०४७६४१०४, राहुल खंडागळे ८७९३१५५७०६ या नंबर वर संपर्क साधावा.अभिषेक प्रसंगी
तसेच कोपरगाव तहसील मैदानात सुरू असलेल्या शिव महापुराण कथेचे समाप्तीला १२ जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आलेले पवित्र रूद्राक्ष मणी सर्व भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. जाहिरात सौजन्य ओम अलंकार सराफ बाजार कोपरगाव.