आपला जिल्हा

श्री राधाकृष्ण मंदिराचा प्रथम वर्धापन दिन होणार मोठ्या उत्साहात साजरा

श्री राधाकृष्ण मंदिराचा प्रथम वर्धापन दिन होणार मोठ्या उत्साहात साजरा

श्री राधाकृष्ण मंदिराचा प्रथम वर्धापन दिन होणार मोठ्या उत्साहात साजरा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ एप्रिल २०२५कोपरगाव तालुक्यातील नऊचारी येथील श्री राधाकृष्ण मंदिराचा प्रथम वर्धापन दिन रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ ते रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ या पूर्वकाळात मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती मंदिराच्या सर्वेसर्वा ह.भ.प संगीता महाराज चव्हाण करंजीकर यांनी दिली आहे.

जाहिरात
लेने को हरिनाम देणे को अन्नदान या म्हणीप्रमाणे मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनी श्री विठ्ठल आश्रम गंगापूर येथील श्रीगुरु गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत यांच्या रसाळ वाणीतून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय चरित्रामृत कथेचे आयोजन रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ ते शनिवार २६ एप्रिल २०२५ या पर्व काळात दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार असून तदनंतर सर्व उपस्थित भाविक भक्तांना सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात
 तसेच रविवार दि २७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत रुई आश्रमाचे ज्ञानेश्वर माऊली शिंदे महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.या कार्यक्रमास शिंगणापूर,करंजी, बोलकी, संवत्सर, ओगदी, पढेगाव, शिरसगाव,कासली, धोक्रट वस्ती, गोपाळवाडा, अंबिका नगर, संजीवनी कारखाना परिसर, येसगाव, खिर्डी गणेश, रेल्वे स्टेशन, लक्ष्मणवाडी,दशरथवाडी, रामवाडी,सडे आदी गावांसह कोपरगाव तालुक्यातील सर्वच भाविक भक्तांचे विशेष सहकार्य लाभणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी अन्नदानासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण श्री राधाकृष्ण मंदिर, कोपरगाव वैजापूर रोड, नऊचारी शिंगणापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे