शहरात महात्मा फुले यांचा पुतळा असावा; एकत्रित प्रयत्न करू- ॲड. संदिप वर्पे
शहरात महात्मा फुले यांचा पुतळा असावा; एकत्रित प्रयत्न करू- ॲड. संदिप वर्पे
शहरात महात्मा फुले यांचा पुतळा असावा; एकत्रित प्रयत्न करू- ॲड. संदिप वर्पे

कोपरगाव विजय कापसे दि ११ एप्रिल २०२५– सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आग्रेसर असलेले तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोपरगाव शहरात महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा असायला हवा असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष अँड संदीप वर्पे यांनी महात्मा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त शहरातील माळी बोर्डिंग येथे शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या अभिवादन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

या प्रसंगी जेष्ठ नेते कोपरगावचे माजी नगराध्यक्ष पदमाकांत कुदळे, ज्योती नागरी पतसंस्थेचे चेअरमन रविकाका बोरावके, अनिल पांढरे, प्रदीप नवले,वैभव गिरमे, माजी नगरसेवक वीरेन बोरावके, दिलीप गिरमे, राजेंद्र गिरमे,गौतम टिळेकर, किरण बोरावके, सतीश भुजबळ, रवी चौधरी, बंडू राऊत आदी सर्व समाजबंधव मोठया संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी अँड संदीप वर्पे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करताना सांगितले की, ते एक थोर विचारवंत लेखक होते त्यांनी शिक्षण,समता,सामाजिक जागृती, अस्पृश्यता, जातीव्यवस्था आदी क्षेत्रात केलेल्या अथांग कार्यामुळे त्यांना महात्मा या उपाधीने गौरवण्यात आले असल्याचे सांगत ऐतिहासिक वारसा असलेल्या कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य टिळक,राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.अण्णाभाऊ साठे आदी राष्ट्र पुरुषांचे पुतळे उभी असून ती सर्व समाजाला व भावी पिढीला प्रेरणा देत आहेत. त्याप्रमाणेच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा देखील पुतळा कोपरगाव शहरांत उभा राहण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असून तशी मागणी आपण सर्व एकत्र येऊन राज्य शासनाकडे व नगरपालिका प्रशासनाकडे करू असे आवाहन अँड संदीप वर्पे यांनी केले असता त्यास सर्व उपस्थितांनी सहमती दर्शवित महात्मा फुले यांना अभिवादन केले.






