कोपरगाव विजय कापसे दि २४ एप्रिल २०२५– गेल्या दोन दिवसापूर्वी जम्मू कश्मीर येथील पहलगम या गावात निष्पाप भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात २८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कोपरगावात प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देत महाविकास आघाडीच्या निषेध व्यक्त करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
जाहिरात
महाविकास आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहलगम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला हा अत्यंत निंदनीय असून मानवतेला काळीमा फासणारा आहे. या हल्यात २८ भारतीय नागरिकांचा जीव गेला तर अनेक जखमी झाले ही अत्यंत दुःखदाय घटना असून या घटनेची केंद्र सरकारने तत्काळ सखोल चौकशी करत दोषी असणाऱ्या दहशतवाद्यांवर तसेच त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या देशांवर कडक ॲक्शन घेत पुन्हा असा भ्याड हल्ला किंवा कृत्य करण्याची त्यांची हिम्मत होणार नाही असे पावले उचलावे यासाठी विरोधी पक्ष म्हणून संपूर्ण महाविकास आघाडी केंद्रसरकार सोबत असेल.जाहिरात
तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत करावी व केंद्र सरकारने अशा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यातून जम्मू-काश्मीर परिसरात सर्व पर्यटन व धार्मिक स्थळांना विशेष सुरक्षा द्यावी तर विशेषता जुलै महिन्यात होणाऱ्या पवित्र अमरनाथ यात्रेस योग्य ते कडक संरक्षण देत केंद्र शासनाने दहशतवादा विरुद्ध कठोर पावले उचलावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदन देते प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे, शिवसेना शहर सनी वाघ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बापू रांधवणे, शिवसेना माजी शहरप्रमुख कलविंदर डलियाल, पप्पू पडियार, इरफान शेख, मनोज कपोते, गौतम बनसोडे, सुनील वर्पे,रवी कथले, माजीद पठाण, दिनेश पवार, आसिफ शेख,ॲड. दिलीप लासुरे, भावेश थोरात, निखिल थोरात, शुभम शिंदे, ओवेस शेख, मोबीन शेख, ॲड. सुरेश मोकळ, सुरेश आसणे, स्वप्निल पवार, रिंकू पवार, अश्फाक शेख, ऋतुराज काळे, रोनक अजमेरे आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे शहर व तालुका पदाधिकारी कार्यकर्तेनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र भावना व्यक्त करत निषेध केला.