आपला जिल्हा

रेल्वे स्टेशन व सहजानंदनगर जिल्हा परिषद शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्ट- रेणूका कोल्हे

रेल्वे स्टेशन व सहजानंदनगर जिल्हा परिषद शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्ट- रेणूका कोल्हे
रेल्वे स्टेशन व सहजानंदनगर जिल्हा परिषद शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्ट- रेणूका कोल्हे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ एप्रिल २०२५सहकार महर्षी स्व.शंकररावजी कोल्हे यांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळेची जी मुहूर्तमेढ रोवली तिचा हा उंचवता आलेख पाहून  समाधान होत असल्याचे मत व्यक्त करत विद्यार्थी व पालकांसमवेत खाली बसून कार्यक्रम पाहत  इंग्रजी माध्यमाच्या शाळांना लाजवेल असा उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद शिंगणापूर व सहाजानंदनगर शाळेने सादर केला असल्याचे प्रतिपादन संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या ट्रस्टी रेणुका विवेक कोल्हे यांनी मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहजानंदनगर व कोपरगाव स्टेशन यांच्या संयुक्तपणे संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

जाहिरात
गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ विजय काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच व जेष्ठ नेते यादवराव संवत्सरकर, जेष्ठ नेते राजूभाऊ लोणारी, माजी सरपंच भिमा संवत्सरकर, उपसरपंच पती शाम संवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य  सजय तुळसकर, निलम जानराव, चित्राताई घुमरे,जेष्ठ नागरिक गणपत विधाटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळू संवत्सरकर, सुनिता खरात, उपाध्यक्ष प्रदिप महाजन, सुनिल शिंदे, ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे, केंद्रप्रमुख संजय महानुभाव यासह तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक व शिक्षक ग्रामस्थ पालक उपस्थित उपस्थित होते.
जाहिरात

 या प्रसंगी गावचे सरपंच डॉ.विजय काळे व माजी सरपंच यादवराव संवत्सरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले तर सरपंच डॉ काळे यांनी  शाळेच्या भौतिक विकासासाठी भविष्यात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

जाहिरात
    सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक  महेंद्र हरकल यांनी तर सुत्रसंचालन शालेय शिक्षक प्रदिप साळवे यांनी केले. कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळेच सदरचा कार्यक्रम यशस्वी करू शकलो अशी भावना सर्व शिक्षकांनी व्यक्त केली सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापक आशा गवळी,शिक्षक बँकचे संचालक आभाळे सर, श्रीम लाड,श्रीम मिटकर, श्रीम दरवडे, श्रीम शिंदे, श्रीम खांदवे, श्रीम पुंडे, आप्पासाहेब चौधरी, साईनाथ चौधरी आदींनी अथक परिश्रम घेतले.तर रेणुका कोल्हे यांची चोकबॉल महाराष्ट्र असोसिएशन च्या अध्यक्षपदी  निवड झाल्याबद्दल दोन्ही शाळांच्या वतीने  सत्कार करण्यात आला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे