आपला जिल्हा

करंजी गावच्या ग्रामस्थांनी मानले खासदार वाकचौरे यांचे आभार

करंजी गावच्या ग्रामस्थांनी मानले खासदार वाकचौरे यांचे आभार

करंजी गावच्या ग्रामस्थांनी मानले खासदार वाकचौरे यांचे आभार

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ एप्रिल २०२५शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधी मधून करंजी येथील बिरोबा मंदिरास सभा मंडप उभारणीसाठी ७ लाख रुपये इतका भरघोस निधी दिल्याबद्दल करंजी गावच्या ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे.

जाहिरात

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवण, उपसरपंच शिवाजी जाधव, यांच्यासह तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे, अमृत संजीवनीचे देविदास भिंगारे,माजी सभापती नवनाथ आगवन, गोरखनाना भिंगारे,अरुण भिंगारे, लक्ष्मण भिंगारे, कृष्णा भिंगारे, संजय उगले, सतीश भालेराव, चंदूनाना भिंगारे, अर्जुन चरमळ अशा अनेक करंजी गावच्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी वेळोवेळी खासदार वाकचौरे यांच्याकडे पाठपुरावा करत बिरोबा मंदिराच्या सभामंडप करीता ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करत सदर सभा मंडपाचे नुकतेच भूमिपूजन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे पुत्र युवा नेते रोहित वाकचौरे यांच्या शुभहस्ते व ग्राहक संरक्षण कक्षाचे मुकुंद सिनगर व करंजी गावच्या ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

जाहिरात

खासदार वाकचौरे यांनी २००९ देखील करंजी गावाला एक सभा मंडप दिला होता व आज देखील ७ लाख रुपयेचा सभा मंडप दिल्याबद्दल संपूर्ण करंजी गावच्या ग्रामस्थांनी खासदार वाकचौरे यांचे आभार व्यक्त करत ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांनी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या करंजी बोकटा हा पाच किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करून मिळावा अशी मागणी खासदार वाकचौरे यांच्याकडे निवेदन देत केली तर बिरोबा मंदिर सभा मंडपाच्या पुढील भागात पेव्हर ब्लॉक बसून मिळावे अशी मागणी बिरोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने शिवाजी आगवन, भास्करशेठ शहाणे, प्रकाश येवले, मधुकर लाडबिले, बाळासाहेब ढवळे, रावसाहेब ढवळे, उत्तम ढेपले आदी कमिटी सदस्यांनी केली आहे.

करंजी गावचे उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक शिवाजी जाधव यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दोन वेळा करंजी गावाला भरघोस निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की, करंजी गाव नेहमीच विकासाच्या बाजूने आपली वाटचाल करत असते आणि वेळेप्रसंगी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारत गावच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय घेत अंमलबजावणी करत असल्याचे सांगत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आभार व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे