संवत्सरचे डाकपाल दत्तू गायकवाड यांचा पोस्टातर्फे विशेष सन्मान
संवत्सरचे डाकपाल दत्तू गायकवाड यांचा पोस्टातर्फे विशेष सन्मान
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २७ एप्रिल २०२५– कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामीण पोस्ट ऑफिस मध्ये डाकपाल म्हणून कार्यरत असलेले दत्तू ज्ञानदेव गायकवाड यांचा नुकताच भारतीय डाक विभागातर्फे उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आल्याने संवत्सर ग्रामीण ब्रांच पोस्ट ऑफिसच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, दत्तू गायकवाड हे संवत्सर पोस्ट कार्यालयात डाकपाल म्हणून कार्यरत असून त्यांनी भारत सरकारचे संचार मंत्रालय भारतीय डाक विभागात आर्टिकल बुकिंग मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट केल्याबद्दल त्यांचा नुकताच पोस्ट विभागाचा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.जाहिरात
याप्रसंगी श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक उमेश जनावडे, डाक निरीक्षक अनंत सोनवणे, आय.पी.पी.बी चे व्यवस्थापक स्वप्निल सावंत, राजेश नेतकर, अर्जुन मोरे, संजय ढेपले, पोपट सुळ, विजय जोर्वेकर आदीं ग्रामीण डाक सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीरामपूर डाक विभागाचे अध्यक्ष उमेश जनावडे यांनी दत्तू गायकवाड यांचे कौतुक करत शुभेच्छा देत ग्रामीण भागात डिजिटल सेवा उपलब्ध करून केंद्र सरकारने एक मोठी संधी उपलब्ध केल्याचे सांगत पोस्ट ऑफिस हे ग्रामीण भागाचे एक विश्वसनीय ठिकाण असुन पोस्टाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन याप्रसंगी जनावडे यांनी केले.जाहिरात