आपला जिल्हा

मोठा वैद्यकीय खर्च; आर्थिक मदतीचे आवाहन

मोठा वैद्यकीय खर्च; आर्थिक मदतीचे आवाहन

कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील महिला रुग्ण
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २० सप्टेंबर २०२५ – असे म्हणतात की जगात भुकेल्या व्यक्तीला अन्नदान आणि आपल्या ज्ञानाच्या तिजोरीत असलेल्या ज्ञानाच्या  महाभंडाऱ्यातुन गरजूंना दान करणे हे एक सर्वश्रेष्ठ दान समजले जाते परंतु यासोबतच कोणी गरजुला  त्याच्या दवाखान्याच्या खर्चासाठी आपल्या परीने केलेली आर्थिक मदत देखील मोठी उपयोगी ठरू शकते याच भावनेतून विचार करत कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील एका महिलेला तिच्या पुढील वैद्यकीय खर्चासाठी आपल्याला शक्य तितकी सढळ हाताने आर्थिक मदत करावी.

बारकोड स्कॅन करा
 सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील शेतकरी कुटुंबातील आशा विजय चरमळ या ३० वर्षीय विवाहित महिलेची गेल्या दीड वर्षांपासून किडनी खराब झाली असून आता पर्यंत ७ ते ८ लाख रुपये खर्च झाला आहे ती सध्या नाशिक येथील नाईन प्लस या हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्याभरापासून उपचार घेत असून तिला तिचे वडील आपली किडनी देणार आहे परंतु या प्रक्रियेसाठी १५ ते २० लाखापर्यंत आर्थिक खर्च अपेक्षित आहे तरी आपण आपल्याला शक्य असेल तितकी आर्थिक रक्कम मदत म्हणून खाली दिलेल्या बँक खात्यावर आपला मदतीचा हात देऊन  माझ्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी मला सहकार्य करावे आपले उपकार मी कधीही विसरणार नाही असे आवाहन तिचे पती विजय दत्तात्रय चरमळ यांनी केले आहे.
बँकेचे नाव-बँक ऑफ बडोदा. 
शाखा- कोपरगाव.
खातेदाराचे नाव-विजय दत्तात्रय चरमळ.
 खाते नंबर- ०४५६८१००००९३४३.
आयएफएससी नंबर- BARB0KOPERG.
 एमआयसीआर कोड- ४२३०१२००१.
फोन पे- ९५५२६०५९५१.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे