आपला जिल्हा

पक्षी वाचवा निसर्ग वाचवा; भागीनाथ आसने यांचा कृतीतून अनमोल संदेश

पक्षी वाचवा निसर्ग वाचवा; भागीनाथ आसने यांचा कृतीतून अनमोल संदेश

पक्षी वाचवा निसर्ग वाचवा; भागीनाथ आसने यांचा कृतीतून अनमोल संदेश

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ मे २०२५आपण राहत असलेल्या परिसरातील जैव साखळीतील महत्त्वाचा घटक म्हणजे पक्षी या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर घटत आहे. विशेषतः सहजपणे दिसणाऱ्या चिमण्या व अनेक सामान्य पक्षी शहरी भागामध्ये अनेक कारणांनी नष्ट होत आहेत. जसे की साधी घरे नष्ट करून त्याऐवजी सिमेंटची घरे उभारणे, मोबाईल टॉवर्स, वृक्षतोड, अवकाळी पाऊस, गारपीट, प्रतिकूल हवामान, नैसर्गिक अधिवास नष्ट करणे, ऋतुचक्रातील बदल, वाढते ध्वनी व वायू प्रदूषण, तप्त उन्हाळा इत्यादी.

जाहिरात

अशा परिस्थितीमध्ये आपण या मुक्या सजीवांबदल संवेदनशीलता व जिव्हाळा राखत त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी अतिशय सोपे पण महत्त्वपूर्ण प्रयत्न करूया. भर उन्हाळ्यात पक्ष्यांना पुरेसे पाणी भरलेली मातीची भांडी घराच्या छतावर, बाल्कनीत, अंगणात तसेच झाडांवर लावून ठेवता येतील त्याच बरोबर अन्नधान्याने (बाजरी तांदूळ) भरलेला ट्रे, ग्रेन फीडर्स लावता येतील. पक्ष्यांसाठी मातीची अथवा लाकडाची कृत्रिम घरटी लावणे शक्य आहे. उष्माघातामुळे अस्वस्थ पक्षी किंवा जखमी असहाय्य पक्ष्यांवर प्रथमोपचार करता येईल. अशारीतीने निसर्गातील या सुंदर, आकर्षक, रंगीबिरंगी, आपल्या सर्वांना उपयुक्त अश्या वसुंधरेच्या अलंकाराचे जतन करूया, संवर्धन करू या.

जाहिरात

गेली पाच वर्षापासून भागिनाथ आसने हे पक्षांसाठी टू इन वन बर्ड फिडर भरून ठेवणे तसेच वाटप करणे,मातीचे जलपात्र भरून ठेवणे,वाटप करणे गाय गोठा मध्ये नियमित दोन बर्ड फिडर भरून ठेवलेले असतात. प्लास्टिकचे जलपात्र प्लास्टिकचे दाणेपात्र आणि सहा मातीची घरटी गोठ्यामध्ये बसवलेली आहे. घरासमोरील आंब्याच्या झाडाला मातीचे जलपात्र,एक टू इन वन बर्ड फिडर तसेच एक प्लास्टिकचे जलपात्र बसवलेले आहे प्लास्टिकच्या जलपात्रावर सावली असल्यास पाणी गरम होत नाही आणि पक्षी पाणी पितात असे आसने सांगतात. आपणही आपल्या परीने हे अभियान आपल्या गावी राबवावे अशी नम्र अपेक्षा. ‘मिळून सारे जण, करुया द्विजगण रक्षण’

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे