आपला जिल्हा

युवा सेना आयोजित रक्तदान शिबिरात ९७ दात्यांनी केले रक्तदान

युवा सेना आयोजित रक्तदान शिबिरात ९७ दात्यांनी केले रक्तदान
युवा सेना आयोजित रक्तदान शिबिरात ९७ दात्यांनी केले रक्तदान
जाहिरात कोल्हे

कोपरगाव विजय कापसे दि १८ मार्च २०२५कोपरगाव शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना प्रणित शहरप्रमुख पै.गगनभैया हाडा व निमा संघटना कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंगळवार दि १८ मार्च रोजी कोपरगाव शहरात आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ९७ दात्यांनी रक्तदान करत देश हिताच्या कार्यास हातभार लावला आहे.

जाहिरात आत्मा

कोपरगाव शहरातील नजम हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे, डॉ.आचारी, डॉ झवर ,डॉ आव्हाड, डॉ रणदिवे,डॉ झिया शेख, शिवसेना समन्वयक मुन्ना मन्सुरी, आकाश वाजे, भावेश थोरात आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

जाहिरात

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे व दात्यांचे आभार व्यक्त करत युवा सेना शहर प्रमुख गगन हाडा यांनी सांगितले की, हिंदुहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिकवणानुसार आह्मी सर्व शिवसैनिक काम करत असून त्यांचाच एक भाग म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या म्हणीप्रमाणे आम्ही सर्व युवा सैनिकांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरात ९७ दात्यांनी रक्तदान करत देश हितासाठी हातभार लावला असून येणाऱ्या काळात देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकटीसाठी कोपरगाव युवा सेना सर्वांना सोबत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत पक्ष संघटन बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सदर रक्तदान शिबिरासाठी पै.गगनभैय्या हाडा, कोपरगाव शहर युवा सेना, निमा संघटना कोपरगाव, नजम हॉस्पिटल कोपरगाव आदींनी अथक परिश्रम घेतले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे