आपला जिल्हा
Related Articles
Check Also
Close
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांची चमचमणारे तारे म्हणून निवड

हे सर्व विद्यार्थी खालील ऑनलाइन प्रोग्रामसाठी पात्र आहेत.
1) जेनवाईजद्वारे प्रतिभाशाली ऑनलाइन प्रोग्राम
२) नॉर्थवेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट (सीटीडी) – ऑनलाइन प्रोग्राम
३) नॉर्थवेस्टर्न सेंटर फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट, यूएसए- ग्रीष्मकालीन (उन्हाळी )निवासी कार्यक्रम
४) परड्यू युनिव्हर्सिटीचा गेरी स्टार प्रोग्राम, यूएसए
५) एसआयजी(SIG) कार्यक्रमांसाठी ग्रीष्मकालीन संस्था
6) कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले, यूएसए – शैक्षणिक प्रतिभा विकास कार्यक्रम (एटीडीपी)
कु.पृथ्वीराज नेहे या विद्यार्थ्याने इंग्रजी, गणित, विज्ञान आणि एमएसटीमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. तर कु.वरद पचोरे या विद्यार्थ्याने ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची मणिपाल येथे जेनवाईजद्वारे २१ दिवसांच्या उन्हाळ्याच्या कार्यक्रमांसाठी निवड झाली आहे.

सर्व चमकदार तारे म्हणून उदयास आलेल्या विद्यार्थ्यांची जिद्द,परिश्रम आणि शाळेने वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची उल्लेखनीय कामगिरी ही त्यांची शिकण्याची जिद्द आणि शाळेत दिल्या जाणाऱ्या सर्वांगीण शिक्षणाचा नमुना आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयू देशमुख, शाळा संचालिका अंजली कन्नावार यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक करून प्रतिभान विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.