आपला जिल्हा

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती भर पावसात कोपरगांवात साजरी

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती भर पावसात कोपरगांवात साजरी

स्वातंत्र्यवीरांचे विचार निडर बनवतात
– स्वच्छतादूत सुशांत घोडके

कोपरगाव विजय कापसे दि २८ मे २०२५स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर म्हणजे राष्ट्रभक्तीने भिनलेले जाज्वल्य विचार आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची मरण यातना भोगलेल्या स्वातंत्र्यवीरांचे जाज्वल्य विचार देशहिताच्या कार्यात नेहमी स्मरण करा रहा. त्यांचे विचार सार्वजनिक जीवनात भिडस्त आणि निडर बनवतात. असे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

जाहिरात

हिंदू महासभेचे अध्यक्ष,थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४२ वी जयंती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचारमंच, महाराष्ट्र प्रांत ,धर्मयोध्दा माजी खासदार स्व. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रांत, कोपरगांव शाखा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटना यांचे वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक कोपरगांव येथे भर पावसात साजरी करण्यात आली.

जाहिरात

याप्रसंगी स्वच्छतादूत सुशांत घोडके, प्रसिद्ध अकौंटन्ट नितीन डोंगरे, सुनील गोखले, रामदास खैरे, रामचंद्र बागरेचा, दिलीपराव घोडके, प्रभाकर वाणी, सुनिल वायखिंडे, निलेश साबळे, राजेंद्र कुदळे, सुशांत खैरे, गिरीश हिवाळे, एकनाथ हिवाळे, अनिल काले,राजकुमार हलवाई,एस.डी.देशपांडे, सुरेश कांगुणे, अमोल हलवाई, राजेंद्र कुदळे, नितीन काले,मुकुल आहेर, गोविंदराम चावला,अनिल पारख, इब्राहिम बागवान, सुरेश भोईर, किशोर मांडगे, बापू गोसावी, विशाल होन ,रवि मोकाशे, विजय पगारे , हेमंत सूर्यवंशी, स्वराज खरात, स्वस्तिक शेळके यांचे सह राष्ट्रप्रेमी नागरिक, छोटे व्यापारी उपस्थित होते.

जाहिरात

प्रारंभी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे प्रतिमापुजन करून करण्यात आले. या प्रसंगी “देश भक्त तुझे नाव…सावरकर…सावरकर, राष्ट्रभक्ती तुझे नाव.. सावरकर…सावरकर…, स्वातंत्र्यवीर अमर रहे, भारत मात की जय, वंदेमातरम्” जयघोष करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार मंच महाराष्ट्र प्रांतचे वतीने सुमारे ११०० नागरिकांना समर्पणसेवेतून स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट दाखविण्यात आला आहे.

जाहिरात गौतम

स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटनेच्या माध्यमातून श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा, प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, श्री रामनवमी सारखे उत्सव आयोजित केले आहे.

स्वातंत्र्यवीर वि. दा. तथा तात्याराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासाचे “सुवर्णपान”. सन १८८३ ते १९६६ हा सावरकर यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्य चळवळ, अस्पृश्यता निवारण, प्रखर राष्ट्रभक्ती या सह त्यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन राष्ट्र विचार धारेला एक उंचीवर नेतो.

जाहिरात

स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर कोपरगांव येथे आले होते. कोपरगांव शहरातील जुने गांवठाण भागातील शनी मंदिर समोरील मैदानावर त्यांची स्वातंत्र्य जनजागृती सभा झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोपरगांव येथील प्रथम संघ चालक स्व. गंगाधरजी तथा अण्णा बागुल यांचे “पथसंचलन” या पुस्तकात पृष्ठ १३ वर ते लिहितात, “ख्रिस्ताब्द १९३८ फेब्रुवारी महिण्याचा दिनांक २७ रविवार. कोपरगांवचा ईतिहास लिहिला गेला तर त्यात नमूद करण्याचा तो सुवर्णदिन. कचदेवाच्या त्यागाने अजरामर झालेल्या, श्रीप्रभू श्रीरामचंद्रच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या त्या गोदावरी तटी आज स्वातंत्र्यवीर तात्यारावांची (सावरकर) ती मंगल भेट. अविस्मरणीय योग. श्री शनीमंदिराच्या पटांगणावर, (सध्या जिथे जिजामाता बालोद्यान आहे.) तेथे स्वातंत्र्यवीरांचे भव्य स्वागत. मला वाटतं, कोपरगांवातील ही पहिलीच विराट सभा. कोपरगांवातील तरुणांच्या वतीने त्यांचे पुष्पहाराने स्वागत करण्याचे भाग्य मला लाभले.” ईति. अण्णा बागुल… स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विराट सभेनंतर कोपरगांव पंचक्रोशीतील वातावरण बदलून गेले… आजही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण कोपरगांवकर ठेवतात…स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नावाने शहरात सावरकर चौक आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर उद्यान आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर काॅलनी आणि स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटना आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे