आपला जिल्हा

एसएसजीएम महाविद्यालयाचे प्रा चंदनशिवेना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 

एसएसजीएम महाविद्यालयाचे प्रा चंदनशिवेना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 
एसएसजीएम महाविद्यालयाचे प्रा चंदनशिवेना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ८ जुन २०२५रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगांव  येथील पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा विभागाचे विभाग प्रमुख  अमोल चंदनशिवे यांना नामांकित गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील वैद्यकीय, प्रशासकीय, सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता,आरोग्य, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व समाज हिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना  महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला जाणारा पुरस्कार दिला जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अण्णासाहेब शिंदे सभागृह अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, रावसाहेब खेवरे, पोलीस आयुक्त संदीप भांड,  तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, रमेश खेमनर, पत्रकार जावेद शेख यांच्या हस्ते शनिवारी  (दि ७) राहुरी कृषी विद्यापीठ येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जाहिरात
प्रा अमोल चंदनशिवे यांची शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान बद्दल पुरस्कार प्राप्त झाल्याने रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा महाविद्यालय, विकास समितीचे चेअरमन अॅड. भागिरत शिंदे, महाविद्यालय विकास समिती सदस्य, प्राचार्य डॉ माधव सरोदे , उपप्राचार्य प्रा. संजय शिंदे, पर्यवेक्षक प्रा. एकनाथ कळमकर, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, प्रा. महेश पाडेकर, प्रमोद मोरे, सुरेश बर्वे,  गितांजली मौळे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षक भारती संघटना पुणे विभाग, अहिल्यानगर विभाग व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आदी संघटना पदाधिकारी, सदस्य यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे