आपला जिल्हा

बेट भागातील त्रंबकेश्वर व कचेश्वर मंदिरास दानशूर भाविकांकडून लॅम्प भेट

बेट भागातील त्रंबकेश्वर व कचेश्वर मंदिरास दानशूर भाविकांकडून लॅम्प भेट
बेट भागातील त्रंबकेश्वर व कचेश्वर मंदिरास दानशूर भाविकांकडून लॅम्प भेट
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० जून २०२५अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव ला पौराणिक व धार्मिक महत्त्व असून असेच एक कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी वसलेले तसेच जगप्रसिध्द परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिर परिसरात असलेल्या त्रंबकेश्वर मंदिर व कचेश्वर मंदिर या ठिकाणी नुकत्याच बांधण्यात आलेल्या नवीन वॉल कंपाऊंड ला बेट भागातील रहिवाशी धार्मिक व सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सदैव पुढाकार घेणारे ॲड. शामलाल मुंदडा व मुंदडा परिवार यांच्यावतीने २४ आकर्षक असे लॅम्प मंदिर चरणी अर्पण करण्यात आले आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील बेट भागातील कचेश्वर मंदिर व त्र्यंबकेश्वर मंदिर अतिशय पौराणिक मंदिर असून गुरु शिष्यांची परंपरा जोपासणारे मंदिर आहे. गुरु शुक्राचार्य महाराजांचे असीम व परमभक्त हे कचेश्वर महाराज होते. याच परिसरामध्ये महादेवाचे अर्थात त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे जेथे महादेवांच्या पिंडीसमोर नंदी नाही. नंदी नसलेलं बहुदा एकमेव मंदिर असावे असा या परिसराचा इतिहास आहे अशा या पौराणिक मंदिराला दानशूर भक्ताने दिलेलं दान हे बहुमूल्य असून ॲड.मुंदडा या दानशूर परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे