आपला जिल्हा

कोकमठाण शाळेचे बर्वे यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान

कोकमठाण शाळेचे बर्वे यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान
                आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राळेगणसिद्धी ता. पारनेर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ जुन २०२५जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकमठाण, ता. कोपरगांव  येथील पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे यांना नामांकित आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रातील  वैद्यकीय, प्रशासकीय,सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता,आरोग्य, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व समाज हिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना  महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला जाणारा पुरस्कार दिला जातो. राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसुधारक पद्मभूषण, पद्मश्री अण्णासाहेब हजारे व पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पर्यावरण  मित्र बहुउद्देशीय संस्थेचा पर्यावरण मित्र पुरस्कार प्राप्त देऊन गौरविण्यात आले.

जाहिरात
 याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे, संतोष गायके पोलीस उपअधीक्षक अतिविशेष पोलीस दल फोर्स वन युनिट महाराष्ट्र राज्य , विठ्ठलराव जाधव विशेष पोलीस महानिरीक्षक से.नि. व डॉ. रागिनी चवरे राष्ट्रीय अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व ज्ञानेश्वर कुंभार पुणे शहर पोलीस हे उपस्थित होते.

जाहिरात
              सुरेश बर्वे सर यांना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या सोबत वृक्षारोपण करण्याची संधी प्राप्त झाली. सुरेश बर्वे यांची शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान आहे. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन कार्यात   विद्यार्थ्यांना सहभागी करून भावी पिढ्यांचा विचार करून देशी वृक्ष लागवड व सवर्धानात केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जाहिरात गौतम
पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी  शबाना शेख , केंद्रप्रमुख संजय महानुभव , मुख्याध्यापिका  जाधव मॅडम ,सरपंच उषाताई दुशिंग ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप लोहकणे ,उपाध्यक्ष बनेमिय्या सय्यद , मनोहर शिंदे,  जाधव सर, लाड सर, निर्मळ सर, परदेशी मॅडम, चव्हाण मॅडम, गुजर मॅडम, भालेराव मॅडम,प्रा. अमोल चंदनशिवे, गितांजली मैळे आदींनी  सुरेश बर्वे  यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे