दुसऱ्या दिवशी १४ इच्छुकानी नेले २२ उमेदवारी अर्ज तर एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
दुसऱ्या दिवशी १४ इच्छुकानी नेले २२ उमेदवारी अर्ज तर एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
दुसऱ्या दिवशी १४ इच्छुकानी नेले २२ उमेदवारी अर्ज तर एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑक्टोबर २०२४– कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काल मंगळवार दि २२ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून काल पहिल्या दिवशी २७ इच्छुक उमेदवारांनी ३९ उमेदवारी अर्ज नेले होते आज दुसऱ्या दिवशी १४ इच्छुक उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज नेले आहे तर आज कोपरगाव विधानसभा मतदारसंघात प्रभाकर पाऊजी अहिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आपले नामनिर्देशन पत्र कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांच्याकडे दाखल केले आहे.

आज बुधवार दि २३ ऑक्टोबर रोजी शकील बाबुभाई चोपदार (कोपरगाव १ अर्ज) बाबुराव सावळेराम पवार (खडकी कोपरगाव १ अर्ज) आशुतोष अशोकराव काळे (माहेगाव देशमुख २ अर्ज) सलीम नसीर पठाण (कोपरगाव १ अर्ज) महेबुब अहमद पठाण (कोपरगाव २ अर्ज) विजय नारायणराव वडांगळे (कोपरगाव १ अर्ज) भागवतराव कचरू कदम (सुरेगाव २ अर्ज) योगेश साहेबराव खालकर (कोपरगाव १ अर्ज) धोंडीराम माधव दहे (दाऊच खुर्द २ अर्ज) भरत आसाराम मोरे (कोपरगाव १ अर्ज) गजानन तुळशीराम साळुंखे (कोळपेवाडी २ अर्ज) सागर रामदास केकाण (जेऊर पाटोदा २ अर्ज) बाळासाहेब कारभारी जाधव (कोकमठाण २ अर्ज) खंडू गहिनीनाथ थोरात (जवळके २ अर्ज) असे १४ इच्छुकांनी २२ अर्ज नेले असून आजपर्यंत ४१ इच्छुकांनी ६१ उमेदवारी अर्ज नेले आहेत.

जवळपास कोल्हे परिवाराने निवडणूकीतून माघार घेतल्यान? संपूर्ण कोपरगाव तालुक्यात राजकिय शांतता पसरली आहे.




