आपला जिल्हा

कोकणगावच्या तुळजाभवानी मंदिरासाठी २० लाखांचा निधी; सभामंडप कामाचा शुभारंभ

कोकणगावच्या तुळजाभवानी मंदिरासाठी २० लाखांचा निधी; सभामंडप कामाचा शुभारंभ

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ.तांबे यांच्या प्रयत्नातून कोकणगाव तुळजाभवानी मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १९ जुलै २०२६– महाराष्ट्राचे माजी महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील तुळजाभवानी मंदिराच्या सभामंडपासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सुरेश थोरात आणि हरिभक्त परायण भागवत बाबा यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

जाहिरात

यावेळी सरपंच आशाताई जोंधळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी जोंधळे, उपसरपंच दिलीप जोंधळे, ॲड. सुरेश जोंधळे, पोपट थोरात, मधुकर पवार, संभाजी जोंधळे, डॉ. दत्तात्रय जोंधळे, नानासाहेब वायकर, हनुमंत जोंधळे, मारुती जोंधळे, बाबासाहेब वायकर, बाबू नाना वायकर, दिगंबर जोंधळे, तुकाराम जोंधळे, नवनाथ वायकर, कचरू जोंधळे, सुरेश वायकर, विलास जोंधळे, सचिन वायकर, रहीमपूरचे पोलीस पाटील आबासाहेब शिंदे, बाबासाहेब शिंदे, बंटी वायकर, पप्पू वायकर, इंजिनिअर जोंधळे, इंजिनिअर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना सुरेश थोरात म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील १७१ गावांमधील मंदिरे आणि समाजमंदिरांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये मंदिरांचा विकास झाला असून कोकणगाव परिसरालाही सातत्याने विकासनिधी मिळाला आहे. श्री क्षेत्र निझरनेश्वर देवस्थानासाठीही मोठा निधी देण्यात आल्याने परिसरात सुशोभीकरणासह विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत.

जाहिरात

हरिभक्त परायण भागवत बाबा यांनी सांगितले की, संगमनेर तालुका वारकरी परंपरेचा वारसा जपणारा असून बाळासाहेब थोरात यांनी मानवता आणि वारकरी विचारांचा सातत्याने प्रचार केला आहे. मंदिरांच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कोकणगावमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सुरेश जोंधळे यांनी केले, तर आभार शिवाजी जोंधळे यांनी मानले.

 तालुक्यातील महादेव मंदिरांच्या विकासालाही चालना
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझरनेश्वर, दुधेश्वर व अमृतेश्वर, खांडगाव येथील खांडेश्वर, धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर तसेच जवळे बाळेश्वर येथील बाळेश्वर मंदिरांसह विविध तीर्थक्षेत्रांना प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व धार्मिक स्थळांच्या विकासात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सुरेश थोरात यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे