आपला जिल्हा
आत्मा मालिक गुरुकुलात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
आत्मा मालिक गुरुकुलात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
आत्मा मालिक गुरुकुलात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
याप्रसंगी गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे यांच्या हस्ते सद्गुरु आत्मा मालिक माऊलींचे पुजन व आरती नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात आली.

इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या वर्गात प्रवेशित सर्वच विद्यार्थ्यांचे चंदन तिलक लावून स्वागत केले आणि वेलकम बॅक टू स्कूल अशा तयार केलेल्या कमानीत प्रत्येक विद्यार्थ्यांचा फोटो घेण्यात आला.
उन्हाळी सुट्टीनंतर आज शाळेचा पहिला दिवस असल्याने सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहित होते. या सर्व नवविद्यार्थ्यांचे गुरुकुलचे प्राचार्य तुषार कापसे स्वागत करत गुरुकुलाविषयी माहिती दिली.

गुरुकुल शिक्षिका मनीषा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ध्येय व मूल्य सांगत नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत करत प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेचे नियम पाळावे व सर्व शिक्षकांप्रती आदर ठेवावा असे सांगत शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा कुमकर आभार अनुराधा जोरी यांनी तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.






