आपला जिल्हा

कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुन २०२५कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, कोपरगाव येथे प्रवेशोत्सव अत्यंत उत्साही व आनंदमय वातावरणात पार पडला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हर्षोल्हासात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सुरेश बोळीज  (जनरल बॉडी सदस्य) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून  पद्माकांत कुदळे साहेब (जनरल बॉडी सदस्य) आणि  रुपेश सिनगर (स्थानिक सल्लागार समिती सदस्य) यांची विशेष उपस्थिती लाभली.

जाहिरात

प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लव्हाटे के. डी. सर यांनी केले. त्यांनी शाळेच्या इयत्ता दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा, गुरुकुल उपक्रम, AI अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन या बाबींची माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी नव्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, पेन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद स्पष्ट दिसून येत होता. यासोबतच, एसएससी परीक्षा मार्च2025 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. तसेच RSP प्रशिक्षण पूर्ण केलेल्या  आरोटे एस. बी. सर व श्रीमती गाडेकर एस. बी. यांचाही विशेष सत्कार झाला.

जाहिरात

कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक कोल्हे सर, प्राथमिक विभागाचे  खाडे सर, तसेच पर्यवेक्षिका श्रीमती जगताप मॅडम उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्रीमती पाटील मॅडम यांनी केलले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीरामपूरचे नगरसेवक  राजेंद्र पवार सर यांनी केले.या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी,पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

जाहिरात गौतम

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे