बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

कोपरगाव विजय कापसे दि २२ जुन २०२५–
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे विशेष उपक्रम राबविण्यात आले. या निमित्ताने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार महर्षी, माजी मंत्री, स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला येसगाव ग्रामपंचायतीचे व स्थानिक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते. येसगाव सहकारी सोसायटीचे चेअरमन सचिन कोल्हे, सरपंच पुंडलिक गायकवाड, उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अमोल झावरे, बाळासाहेब गायकवाड, कपिल सुराळकर, ग्रामसेवक काळे, तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे निमंत्रित सदस्य किरण गायकवाड, स्थानिक सल्लागार समिती सदस्य अतुल सुराळकर, रवींद्र कळसकर, संजय आहेर, उमेश कोकाटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ ठाकरे यांनी सूत्रसंचालन उपशिक्षक रामदास गायकवाड यांनी तर आभार पर्यवेक्षिका जयश्री आंबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक शिवाजी भुतांबरे, योगेश कदम, प्रवीण बोराडे, दीपक खालकर, बाबासाहेब धनवडे, पांडुरंग जायभाये, गौरव मुळे, अनिल सरोदे, गंगाधर घोरपडे, अमोल देवस्थळे, रेवजीनाना शिंदे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहचवण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात, एकोप्याने व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.



