आपला जिल्हा

येसगाव शाळेत पोक्सो कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

येसगाव शाळेत पोक्सो कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

येसगाव शाळेत पोक्सो कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ जून २०२५न्यू इंग्लिश स्कूल येसगाव येथे कोपरगाव तालुका विधी सेवा समिती आणि तालुका विधिज्ञ संघ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पोक्सो कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम’ शनिवार दि २१ जानेवारी रोजी साजरा आयोजित करण्यात आला.

जाहिरात

जिल्हान्यायाधीश दि.दा.आलमले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व वक्त्या म्हणून  सह दिवाणी न्यायाधीश जे.एस केळकर यांनी उपस्थित राहून पोक्सो  कायद्याचे स्वरूप, उद्देश व त्याची अंमलबजावणी यावर सविस्तर माहिती दिली.

जाहिरात

तसेच जिल्हा सरकारी वकील व कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ए. एल. वहाडणे, दिवाणी सरकारी वकील तथा माजी तालुकाध्यक्ष ॲड .अशोकराव टुपके, तसेच विशेष सरकारी वकील ॲड. उत्तमराव पाईक साहेब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

जाहिरात गौतम

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक  रंगनाथ ठाकरे यांनी सूत्रसंचालन उपशिक्षक  रामदास गायकवाड यांनी तर आभार  पर्यवेक्षिका जयश्री आंबरे  यांनी केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण झाली असून बालकांच्या सुरक्षिततेबाबतचे महत्त्व अधोरेखित केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे