आपला जिल्हा

जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी निःशुल्क तपासणी व साहित्य वितरण शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी निःशुल्क तपासणी व साहित्य वितरण शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी निःशुल्क तपासणी व साहित्य वितरण शिबिरांचे आयोजन

जाहिरात

अहिल्यानगर विजय कापसे दि जुलै २०२५: जिल्ह्यातील अस्थिव्यंग प्रकारच्या दिव्यांगांना कृत्रिम हातपाय बसविणे, कॅलिपर्स मोजमाप व निःशुल्क साहित्य वितरणासाठी तालुकानिहाय शिबिरे ७ ते २१ जुलै २०२५ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली आहे.

जाहिरात

७ जुलै रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विळदघाट, अहिल्यानगर येथे शिबिर होईल. ८ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय, पाथर्डी; ९ जुलै रोजी जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय, टिळकरोड, अहिल्यानगर; १० जुलै रोजी नूतन कन्या विद्यालय, राहुरी; ११ जुलै रोजी मुकबधीर विद्यालय, गायत्री मंदिराजवळ, अशोक थिएटरसमोर, बेलापूर रोड, श्रीरामपूर; १२ जुलै रोजी आनंद लॉन्स मंगल कार्यालय, बाजार समिती रोड, पारनेर; १३ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी, संगमनेर; १४ जुलै रोजी साईबाबा तपोभूमी प्रदर्शन हॉल, कोपरगाव; १५ जुलै रोजी साईविठ्ठल लॉन्स, चितळी रोड, राहाता; १६ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय, शेवगाव; १७ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय, नेवासा; १८ जुलै रोजी रत्नकमल मंगल कार्यालय, पंचायत समिती शेजारी, श्रीगोंदा; १९ जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जामखेड; २० जुलै रोजी सर्वोदय कॉम्प्लेक्स, ग्रामीण आरोग्य केंद्राशेजारी, कोल्हार-घोटी रोड, अकोले; तर २१ जुलै रोजी साई निर्माण ग्रुप न्यू इंग्लिश स्कूल, नवीन विमानतळ रोड, शिर्डी येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

सर्व अस्थिव्यंग प्रकारच्या गरजू दिव्यांगांनी आधारकार्ड, रेशनकार्ड व युडीआयडी वैद्यकीय प्रमाणपत्रासह या शिबिरांना उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. भंडारी यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे