आपला जिल्हा

कै.सौ.सुशीलामाई काळे यांना पुण्यस्मरण निमित्त भोजडे विद्यालयात अभिवादन

कै.सौ.सुशीलामाई काळे यांना पुण्यस्मरण निमित्त भोजडे विद्यालयात अभिवादन

कै.सौ.सुशीलामाई काळे यांना पुण्यस्मरण निमित्त भोजडे विद्यालयात अभिवादन

कोपरगाव विजय कापसे दि २० जानेवारी २०२५कै.सौ.सुशीलामाई शंकरराव काळे यांच्या २६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य नानासाहेब सिनगर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, कर्मवीर शंकरराव काळे साहेब व कै. सुशीलामाई काळे यांच्या कन्या स्नेहलताई शिंदे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. प्रमोद जगताप आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

जाहिरात आत्मा

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे यांनी करताना विद्यालयात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली माईच्या माध्यमातून भरीव मदत विद्यालयास मिळाली त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कै.माईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत झाली.

जाहिरात

प्रसंगी स्नेहल शिंदे यांनी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या म्हणीप्रमाणे आयुष्यात आईचे महत्व काय असते यावर मार्गदर्शन करत मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव न मानत माईने आम्हा भावंडांना एक समानतेची शिकवण दिल्याचे सांगत माईच्या आठवणीना उजाळा दिला

ॲड.प्रमोद जगताप यांनी कर्मवीर शंकरराव काळेसाहेब व सिनगर कुटुंबाचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून दोन्ही घराणे शिक्षण प्रेमी असल्याने भोजडे येथे सुरू झालेल्या कै. सुशीलामाई शंकरराव काळे विद्यालयातून अनेक विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटवीत असल्याचे गौरवोउद्गार त्यांनी व्यक्त केले.

जाहिरात

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कै. सुशिलामाई शंकराव काळे विद्यालयाच्या स्थापनेच्या इतिहास सांगत विद्यालयातील अनेक विद्यार्थी आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अति उच्च कार्य करत असल्याचे सांगितले.

जाहिरात

या प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याचा वसा घेऊन समाजातील तळागाळातील मुलं-मुली शिकली पाहिजे या उदात्त हेतूने कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी संपूर्ण राज्यभर रयत शिक्षण संस्थेचे जाळे वाढविले या कामी त्यांना कै. सौ. सुशीलामाईची मोलाची साथ मिळाली त्यामुळे आज संबंध राज्यभरातील रयतचे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटवीत असून ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. तर आज साहेबांच्या व माईच्या कार्याचा वसा माजी आमदार अशोकदादा काळे व आमदार आशुतोष काळे हे जोमाने पुढे नेत आहे. त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी जीवनात अभ्यासाची चिकाटी, मेहनत, अंगाशी बाळगत उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन आपले ध्येय प्राप्त करत आपले आपल्या कुटुंबाचे गावाचे विद्यालयाचे नाव उंचवावे असे आवाहन अरुण चंद्रे यांनी विद्यार्थ्यांना करत कोशीश करने वालों की हार नही होती ही कविता सादर करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

या प्रसंगी शालेय शिक्षक दत्तू शिंदे, ग्रामस्थ प्रकाश गायकवाड, विद्यालयातील विद्यार्थिनी संस्कृती जाधव व वैष्णवी नरोडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत माईंच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केले. तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक गोविंद गोरे यांनी तर उपस्थितांचे आभार भागवत माळोदे यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक स्कूलकमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब सिनगर सर्व समिती सदस्य, गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यासह विद्यालयाचे महारू चव्हाण, तब्बसुम शेख, कमल साबळे, योगिता सुराळकर,शिवाजी धट, पंडित सिनगर, रफिक सय्यद आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह,पालक,शिक्षण प्रेमी नागरिक, ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे