बीपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजी शाळेत वह्यांचे वाटप
बीपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजी शाळेत वह्यांचे वाटप

कोपरगाव विजय कापसे दि १९ जुलै २०२५– संजीवनी उद्योग समूहांचे अध्यक्ष बीपीनदादा शंकरराव कोल्हे यांचा २१ जुन रोजी असलेला वाढदिवस दरवर्षी संबंध तालुक्यातील त्यांचा मित्र परिवार व कार्यकर्ते अवाढव्य खर्चाला फाटा देत विविध सामाजिक उपक्रम घेत तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत साजरा करत असतात त्याच अनुषंगाने तालुक्यातील करंजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांना शनिवार दि १९ जुलै रोजी ग्रामस्थांनी शालेय वह्यांचे वाटप करत अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला.

माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ आगवन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी लोकनियुक्त सरपंच रविंद्र आगवन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे, अमृत संजीवनीचे देविदास भिंगारे, टीडीपीचे संचालक अरुण भिंगारे, डॉ सुनिल देसाई, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ फापाळे, साईनाथ भिंगारे, दादासाहेब भिंगारे यासह गोरख भिंगारे, अनिल शिंदे,गणेश भिंगारे, बाळासाहेब भिंगारे, गणेश फापाळे, अनिल डोखे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब भिंगारे, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भाकरे यांच्या सह शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.





