आपला जिल्हा

कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या इमारतींना दोन कोटी निधी मंजुर – आ.आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या इमारतींना दोन कोटी निधी मंजुर – आ.आशुतोष काळे
कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या इमारतींना दोन कोटी निधी मंजुर – आ.आशुतोष काळे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ जुलै २०२५– – ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थितपणे होण्यासाठी त्या ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लक्ष याप्रमाणे एकूण दोन कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

जाहिरात
जाहिरात

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी व नागरिकांना चांगली सेवा मिळावी या उद्देशातून महायुती शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चासनळी, शिंगणापुर, धारणगाव, मुर्शतपूर, करंजी, दहेगाव बोलका, जेऊर पाटोदा, धोत्रे या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीसाठी दोन कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना गावचा कारभार करतांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मतदार संघातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी आ.आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाला गती देवून या   विकासाबरोबरच शासकीय कार्यालयांचा देखील विकास करण्यावर आ.आशुतोष काळे यांनी भर दिला असून अनेक शासकीय कार्यालयांना निधी देवून नागरिकांच्या व प्रशासकीय अधिकऱ्यांच्या अडचणी कायमच्या दूर केल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी अडचण दूर होवून नागरिकांना सेवा मिळण्यात मोठी सोय झाली आहे.

जाहिरात

या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे चासनळी, शिंगणापुर, धारणगाव, मुर्शतपूर, करंजी, दहेगाव बोलका, जेऊर पाटोदा, धोत्रे गावच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीसाठी निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे