गणितातील पाय या संकल्पनेचा ब-याच विज्ञान विषयात उपयोग करता येतो – प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ. निवास पाटील
गणितातील पाय या संकल्पनेचा ब-याच विज्ञान विषयात उपयोग करता येतो – प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ. निवास पाटील

संगमनेर विजय कापसे दि २३ जुलै २०२५– दैनंदिन जीवन जगत असताना गणित हे नेहमी मनुष्याच्या उपयोगी येत असते. विविध समस्या सोडवण्यासाठी गणितातील अनेक सूत्रे व संकल्पना उपयोगी येत असतात. गणितातील पाय या संकल्पनेचा बऱ्याच विज्ञान विषयात उपयोग करता येतो असे प्रतिपादन प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ. निवास पाटील यांनी केले आहे.

नांदुरी दुमाला येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय व नामदार बाळासाहेब थोरात ज्युनिअर कॉलेज नांदुरी दुमाला येथे आंतरराष्ट्रीय पाय दिनानिमित्त प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ निवास पाटील बोलत होते. नांदुरी दुमाला येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय व लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय पाय दिनानिमित्त प्रसिद्ध वैज्ञानिक लेखक डॉ निवास पाटील यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक विलास कवडे, विद्यासागर शिक्षण संस्थेचे सचिव सचिन मालेगावकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शांताराम डोंगरे, विद्यालयाचे प्राचार्य बी.व्ही. वामन सर, देशमुख सर, गुंजाळ सर , उपरे सर, शिंदे सर, पावसे सर , शिंदे सर, शिरोळे सर , रोहम मॅडम ज्युनिअर कॉलेजचे राऊत सर, सय्यद सर, श्रीमती कवडे मॅडम, श्रीमती गोरडे मॅडम, श्रीमती गायखे मॅडम ,तसेच सुनील कवडे, निलेश गाडांळ, अरुण कवडे, शिक्षकेत्तर सेवक वृंद, आणि विद्यार्थी उपस्थित होते.





