पुणे विद्यापीठात दंडकारण्य अभियानाची गाणी दंडकारण्य अभियानामुळे वृक्ष संवर्धन संस्कृती – प्रा. बाबा खरात
दंडकारण्य अभियानामुळे वृक्ष संवर्धन संस्कृती – प्रा. बाबा खरात
पुणे विद्यापीठात दंडकारण्य अभियानाची गाणी
दंडकारण्य अभियानामुळे वृक्ष संवर्धन संस्कृती – प्रा. बाबा खरात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे बहि:शाल शिक्षण मंडळाच्या बैठकीत त्यांनी दंडकारण्य अभियानाची विविध गीते सादर केली. यावेळी प्रा. डॉ हरीश नवले, प्रा .चं का देशमुख ,ॲड जयश्री शिंदे, जगन्नाथ थोरात, नामदेव कहांडळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा खरात म्हणाले की, एकविसाव्या शतकामध्ये सजीव सृष्टीला पर्यावरणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्लोबल वार्मिंग ची समस्या वाढली आहे तापमान वाढले आहे पाण्याची कमतरता भासत आहे. हवामानामध्ये अनियमता झाली आहे. यावर मात करण्यासाठी थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 2006 मध्ये दंडकारण्य अभियान सुरू केले.

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात दरवर्षी लाखो वृक्षांची रोपण केले जात असून अनेक उघडी बोडके डोंगर आता हिरवे दिसू लागली आहे. हे अभियान सह्याद्री ते सातपुडा असे पोहोचले आहे.

नुकतेच माजी आमदार डॉ सुधीर तांबे व दशरथ वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तशृंगी गड येथे 55 हजार वृक्षांची रोपण करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. पुणे विद्यापीठ सातत्याने पर्यावरण संवर्धनासाठी मोठे काम करत असून त्यांच्या अनेक उपक्रमांमुळे महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांमध्ये याची जाणीव जागृती होत आहे. हे काम अधिक वाढवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
तर प्रा. चं.का देशमुख म्हणाले की, पर्यावरण संवर्धना बरोबर स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा विचार प्रत्येकाने अंमलात आणला तर भारत खऱ्या अर्थाने समृद्ध आणि स्वच्छ होईल.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगती व्यक्त केली.



