आपला जिल्हा
शनिवारी मालदाड येथे दंडकारण्य अभियानाचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात ,मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत शुभारंभ
शनिवारी मालदाड येथे दंडकारण्य अभियानाचा
माजी मंत्री बाळासाहेब थोरात ,मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

संगमनेर विजय कापसे दि ३१ जुलै २०२५—सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले असून 19 व्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वा. मालदाड येथील कानिफनाथ मंदिर डोंगर येथे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.






