आपला जिल्हा

अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा दिली-मुकुंद मामा काळे

अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा दिली-मुकुंद मामा काळे

अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा दिली-मुकुंद मामा काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ ऑगस्ट २०२५साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त संवत्सर येथील वाघीनाला वस्ताद प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते.त्यांनी अण्णाभाऊ साठे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.यावेळी बोलतांना काळे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा दिली.

जाहिरात

मुकुंद मामा काळे यांनी माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांचा पहिला पुतळा सर्वप्रथम कोपरगाव येथे स्थापन केला याबद्दल माहिती दीली,त्यांच्या गावी जावुन फोटो मिळवुन पुतळा तयार करून घेतला त्यानंतर कोपरगाव येथे स्थापन केला.यानंतर इतर ठिकाणी अनेक पुतळे उभे राहिले.परिस्थितीतमुळे अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण जरी कमी झाले मात्र आज सर्व शाळेत त्यांचे चरित्र अभ्यासाला आहे.याचे कारण त्यांचे ज्ञानाची दखल परदेशात देखील घेतली गेली होती असे मत व्यक्त केले.या वेळी वस्ताद प्रतिष्ठानच्या वतिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघीनाला ३० विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वही,पट्टी,पेन,पेन्सिल,रबर व अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर आधारीत पुस्तक वाटप केली.

जाहिरात

या कार्यक्रमाला छायाताई मुकुंदमामा काळे,मंगलताई खरे,सोनालीताई खरे,मोनिकाताई पगारे,वनिताताई खरे,वस्ताद प्रतिष्ठान संवत्सर विशाल पगारे,राहुल खरे,प्रदीप खरे,रावसाहेब खरे,रामभाऊ खरे,महेफुज शेख,रंगनाथ पगारे,वैभव पगारे,कांतीलाल पगारे,कृष्णा पगारे,भानुदास खरे,दत्तात्रय खरे,साहिल बागुल,सुरज खरे,जीवन खरे,समाधान खरे,समरप्रीत खरे,दिगंबर खरे,कृष्णा खरे,श्रेयस पगारे,संदीप खरे,दिलीप खरे,बाळासाहेब बागुल,जनार्दन पगारे,विशाल खरे हे ऊपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे