डॉ कोळपे

कोळपेवाडीच्या सुप्रसाध हॉस्पिटलमध्ये हाताची मोफत शस्त्रक्रिया यशस्वी 

कोळपेवाडीच्या सुप्रसाध हॉस्पिटलमध्ये हाताची मोफत शस्त्रक्रिया यशस्वी 
कोळपेवाडीच्या सुप्रसाध हॉस्पिटलमध्ये हाताची मोफत शस्त्रक्रिया यशस्वी 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ सप्टेंबर २०२४–कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील प्रसिद्ध डॉ. कोळपे नॉलेज सिटीच्या सुप्रसाध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला रुग्णाच्या हाताच्या हाडाची यशस्वीपणे शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली असल्याची माहिती हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र निकम यांनी दिली आहे.

जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील डॉ. कोळपे नॉलेज सिटी संचलित सुप्रसाध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी एक वरदान ठरत असून नुकतीच या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत शहाजापूर येथील मंगल संजय वाबळे या महिला रुग्णाच्या हाताच्या हाडाची मोफत शस्त्रक्रिया यशस्वीपणे संपन्न झाली असून त्या महिलेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. तरी परिसरातील गरजु रुग्णांनी डॉ. कोळपे नॉलेज सिटी संचलित सुप्रसाध हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. कोळपे नॉलेज सिटी संचलित सुप्रसाध हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.प्रकाश कोळपे व डॉ. धनंजय कोळपे यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे