आपला जिल्हा

संतश्रेष्‍ठ श्री.निवृत्‍ती महाराज पालखी सोहळ्याचे भक्‍तमीय वातावरणात सहकार पंढरीत स्‍वागत

संतश्रेष्‍ठ श्री.निवृत्‍ती महाराज पालखी सोहळ्याचे भक्‍तमीय वातावरणात सहकार पंढरीत स्‍वागत

संतश्रेष्‍ठ श्री.निवृत्‍ती महाराज पालखी सोहळ्याचे भक्‍तमीय वातावरणात सहकार पंढरीत स्‍वागत

जाहिरात

Loni vijay kapse दि ७ जुलै २०२६- संतश्रेष्‍ठ श्री.निवृत्‍ती महाराज पालखी सोहळ्याचे भक्‍तमीय वातावरणात सहकार पंढरीत स्‍वागत करण्‍यात आले. परंपरेप्रमाणे लोणी बुद्रूक ग्रामस्‍थांनी या पालखी सोहळ्याचे सुयोग्‍य   नियोजन केले होते. केवळ लोणी बुद्रूकच नाही तरी संपूर्ण अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये  पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पालख्‍यांसाठी उपलब्‍ध करुन दिलेल्‍या सुविधा आणि चांगल्‍या सोयीबद्दल वारक-यांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.

जाहिरात

त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेल्या पालखी सोहळ्याचा सोमवारी गोगलगाव येथे आगमन झाले. भारतीय जनता पक्षाचे उपाध्‍यक्ष डॉ.सुजय विखे पाटील आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्‍यासह ग्रामस्‍थांनी भक्‍मीमय वातावरणात स्‍वागत केले. मंगळवारी या पालखी सोहळ्याचे लोणी बुद्रूकमध्‍ये आगमन झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडुरंग हरी”च्या जयघोषाने सहकार पंढरी दुमदुमून गेली. ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीचे जल्लोषात स्वागत करत वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्‍यात आली होती.

जाहिरात

लोणी येथे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ह.भ.प. भारत महाराज धावणे, किसनराव विखे, अनिल विखे, लक्ष्‍मण बनसोडे, किशोर धावणे, भाऊसाहेब धावणे, विकास म्हस्के, यांच्यासह ग्रामस्‍थ व भाविक उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने दिंडीतील मानकरी जयवंत महाराज गोसावी, मोहन महाराज बेलापूरकर, ह.भ.प माधवदास महाराज राठी, उपाध्यक्ष राहुल महाराज साळुंखे, बाळकृष्ण महाराज टापरे, सचिव श्रीपाद महाराज कुलकर्णी, नवनाथ महाराज गांगुर्डे, चैतन्य महाराज नागरे आदींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पालखी प्रमुख माधवदास महाराज राठी म्हणाले, “वारकरी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता केवळ पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने वारी करतो. पालखी सोहळा सुरू झाल्यापासून पावसानेही हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.” यंदाच्या पालखी सोहळ्यात ६५ दिंड्यांमधून सुमारे ५० हजार वारकरी सहभागी झाले आहेत. पालखी सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अहिल्‍यागर जिल्‍ह्यामध्‍ये पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मागील तिन वर्षांपासून वारक-यांसाठी सोयी सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍याची सुरु केलेली प्रथा यंदाही कायम असल्‍याचे समाधान व्‍यक्‍त करुन, कालही पाऊसामुळे निर्माण झालेल्‍या समस्‍यांवर डॉ.सुजय विखे पाटील यांनी तातडीने उपाय करुन, वारक-यांसाठी सुविधा निर्माण करुन दिल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये मंत्री विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने वारक-यांसाठी आरोग्य सेवा उपलब्‍ध करुन दिली जातेच परंतू यंदाच्‍या वर्षी वारकरी चरण सेवेचा उपक्रम सुरु केल्‍याबद्दलही ह.भ.प माधवदास महाराज राठी यांनी समाधान व्‍यक्‍त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे