आपला जिल्हा

आत्मा मालिक गुरुकुलात लोकमान्य यांची पुण्यतिथी व लोकशाहीर यांची जयंती साजरी

आत्मा मालिक गुरुकुलात लोकमान्य यांची पुण्यतिथी व लोकशाहीर यांची जयंती साजरी

आत्मा मालिक गुरुकुलात लोकमान्य यांची पुण्यतिथी व लोकशाहीर यांची जयंती साजरी

जाहिरात

येवला विजय कापसे दि ३ ऑगस्ट २०२५विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी  व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

जाहिरात

याप्रसंगी प्राचार्य तुषार कापसे, मठाधिपती संत चरणदास महाराज व केजी शिक्षिका सोनाली राजपूत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली.

जाहिरात

मनीषा कुमकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली व टिळकांची अतिशय सुंदर कविता सादर केली. तसेच प्राचार्य तुषार कापसे व संत चरणदास महाराज यांनीदेखील विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विषयी अधिक माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे