भारत माता की जय’ या घोषाला साजेल असे काम करुया- आत्मा मालिक मिलिटरी व एनसीसी प्रशिक्षण प्रमुख साईनाथ वर्पे
भारत माता की जय’ या घोषाला साजेल असे काम करुया- आत्मा मालिक मिलिटरी व एनसीसी प्रशिक्षण प्रमुख साईनाथ वर्पे
माजी खासदार भिमराव बडदे यांची जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

कोपरगाव विजय कापसे दि ३ ऑगस्ट २०२५–देशाप्रती अभिमान बाळगून आपण नेहमी “भारत माता की जय” घोषणा देत असतो. परंतू या जय घोषाला साजेसे कार्य आपणाकडून होते की नाही याचे आत्मपरीक्षण ज्याने-त्याने आपापल्या परीने करण्याचे आवाहन आत्मा मालिक मिलिटरी व एनसीसी प्रशिक्षण प्रमुख साईनाथ वर्पे यांनी एका कार्यक्रमात केले.

लोकनेते, माजी खासदार भिमराव बडदे यांच्या ७८ व्या जयंती निमित्त कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात “सैनिक सेवा ओळख आणि शिस्त” या विषयावर आत्मा मालिक मिलिटरी व एनसीसी प्रशिक्षण प्रमुख साईनाथ वर्पे विशेष व्याख्यान धर्मयोध्दा माजी खासदार ॲड. कै. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रांत वतीने आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रसेविका नानीसाहेब बडदे, मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, स्वच्छतादूत सुशांत घोडके, लोकतंत्रसेनानी लताताई चौधरी, स्वातीताई मुळे, मुकुंद कालकुंद्री, सतिश चव्हाण, देवेंद्र कालकुंद्री, ज्येष्ठ नागरिक मंचाचे गणपत विधाटे,उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर, पर्यवेक्षक बलभीम उल्हारे, राजश्री बोरावके, अतुल कोताडे उपस्थित होते.

कार्यक्रमास माजी खासदार प्रदिपदादा रावत, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, स्थानिक स्कूल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, संदीप अजमेरे, आनंद ठोळे, राजेश ठोळे यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी श्री. वर्पे पुढे म्हणाले, आपण ज्या परिस्थितीतून मुलांना शिकवतो त्या परिस्थितीची जाणिव आपण मुलांना करुन दिली पाहिजे. मुली सुध्दा भविष्यात सैन्यात भरती होवू शकतात. शौर्याचा गौरव होतांना त्या उंचीपर्यंत जाण्यासाठी सोसलेले दु:ख मोठे असते. जीवनात संघर्ष महत्वाचा असल्याचे सांगत सैनिक सेवेतील विविध पदे आणि सैनिक सेवा भरती पूर्व तयारी संदर्भात माहिती सांगितली.
प्रारंभी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, लोकनेते माजी खासदार भिमराव नाना बडदे यांची जयंती निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. लोकतंत्रसेनानी मुकुंद कालकुंद्री यांनी “बलसागर भारत होवो” हे गीतगायन केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी धर्मयोध्दा माजी खासदार ॲड. कै. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रांतचे सदस्य, श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, श्रीमान गोकुळचंदजी परिवाराने परिश्रम घेतले.सुत्रसंचालन दिगंबर देसाई यांनी तर आभार सुशांत घोडके यांनी मानले. विद्यार्थी जडणघडणीत भविष्याचा वेध घेणा-या कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे पालकांनी आभार मानले.




