विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार

खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा
तालुक्यातील तरुणाईचा उद्रेक, व्हिडिओने त्रस्त तरुणांनी माध्यमांशी साधला संवाद

संगमनेर प्रतिनिधी दि १७ डिसेंबर २०२५– लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची ओळख ही विकसित आणि सुसंस्कृत तालुका म्हणून राज्याला झाली आहे. मात्र मागील एक वर्षापासून तालुक्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी दहशत गुंडगिरी वाढली असून या पाठीमागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. नवीन लोकप्रतिनिधी यांनी मागील एक वर्षात खोटे व्हिडिओ बनवणे आणि फ्लेक्स बाजी शिवाय एक तरी विकासाचे काम केले का असा सवाल विचारताना विधानसभेमध्ये खोटी माहिती सांगून तालुक्याची व आपली बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे सार्थक कांदळकर साईराज कांदळकर व अक्षय दिघे यांनी म्हटले आहे.

माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना संगमनेर चे नवीन लोकप्रतिनिधी यांच्या यंत्रणेने तयार केलेल्या खोट्या व्हिडिओ मधून त्रस्त झालेले युवक साईराज कांदळकर, सार्थक कांदळकर व अक्षय दिघे बोलत होते. यावेळी सार्थक कांदळकर म्हणाला की, खताळ यांच्या यंत्रणेने जे व्हिडिओ तयार केले त्यामध्ये तुषार पडवळ दिसतो आहे. तो मी नाही आणि माझे व्हिडिओ बनवून यांनी टाकले यामुळे माझ्या बहिणीचे लग्न सुरू असताना आमच्या घरच्यांना खूप त्रास झाला नातेवाईकांना मनस्ताप झाला. याला जबाबदार नवीन लोकप्रतिनिधी आहे. ते खोटे व्हिडिओ बनवत असून तालुक्याला फसवत आहे. यापूर्वीही त्यांनी भंडारे यांचा व्हिडिओ बनवून असेच बनवाबनवी केली होती.
तर साईराज कांदळकर म्हणाला की, विधानसभा हे पवित्र सभागृह आहे आणि तेथे कायम संगमनेर तालुक्याच्या विकासाचा आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा आदर केला जातो. मात्र मागील एक वर्षांमध्ये तालुक्याची बदनामी करण्याचा विडा उचललेल्या नवीन लोकप्रतिनिधीने आमचे नावे तेथे सांगितले खोटी माहिती दिली याबद्दल विधानसभेची आणि तालुक्यातील जनतेची त्यांनी माफी मागितली पाहिजे.

तर अक्षय दिघे म्हणाला की, मागील एक वर्षांमध्ये नवीन लोकप्रतिनिधीने फक्त खोटे व्हिडिओ बनवली आणि फ्लेक्स बाजी केली आहे. एक तरी विकासाचे काम केले का ते पहिले दाखवा. कुठेही गेले की 40 वर्षात काय झाले असे सांगतात तुम्ही ज्या शाळेत शिकले तुम्ही ज्या रस्त्यावरून चालता तुम्ही जे विकसित संगमनेर पाहता ते सर्व लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे उभे आहे. आणि सोशल मीडियावर ट्रोलबाजी करणारे त्यांचे समर्थक समाजासाठी किती उपयोगी पडले हे जनतेने तपासून पहावे असे ते म्हणाले. खोटे व्हिडिओ बनवणे आणि व्यक्तिगत बदनामी करणे या कारणी तक्रार दाखल करणार असल्याचे या उच्चशिक्षित युवकांनी सांगितले आहे
” खोटं बोलायचं नाय ” सोशल मीडियावर ट्रेडिंग
संगमनेरचे लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेमध्ये खोटी माहिती दिली याचबरोबर सातत्याने ते खोटं बोलत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या ” खोटं बोलायचं नाय ” हा ट्रेडिंग सुरू असून यामधून अमोल खताळ हे वर्षभरात कसे सातत्याने खोटे बोलत आहे हे युवकांनी दाखवणे सुरू केले आहे. याचबरोबर जेथे खोटं बोलले त्यांना तातडीने उत्तर द्या असे आवाहन तरुणाईने केले आहे.
युवकांनो उद्याचे पेपर वाचासोशल माध्यमांबरोबर अत्यंत महत्त्वाचे असलेल्या वर्तमानपत्रांमधून आम्ही आमची बाजू स्पष्ट मांडली आहे. खरे मांडले आहे. व्हिडिओ मधील तुषार पडवळचा आक्का कोण आहे ? ते सर्वांना माहिती आहे. याचबरोबर आमची पत्रकार परिषद आणि माहिती सर्वांनी वृत्तपत्रांमधून उद्या वाचावी असे आवाहन सोशल मीडियाच्या ट्रेडिंग मधून संगमनेर तालुक्यात सुरू आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून चांगल्या कामाला पाठिंबा असल्याचे सोशल मीडिया मधून सांगण्यात आले आहे.



