नितीनराव औताडे

जॉगिंग ट्रॅक मुळे कोपरगाव शहराच्या विकासात भर पडणार-नितिनराव औताडे 

जॉगिंग ट्रॅक मुळे कोपरगाव शहराच्या विकासात भर पडणार-नितिनराव औताडे 
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १ कोटी रुपये मंजूर 
कोपरगाव विजय कापसे दि १४ ऑक्टोबर २०२४–  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दूरदृष्टी नेतृत्वातून विकासाला खूप महत्त्व दिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे  यांचा वारसा घेऊन शिवसेना ८०  टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारी संघटना असल्याचे सिद्ध केले आहे. नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण  कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत  कोपरगाव नगर परिषदेसाठी १ कोटी रुपये निधी जॉगिंग ट्रॅक बनवण्यासाठी मंजूर करण्यात आला. ही कोपरगावकरांसाठी अभिमानाची बाब असून दहा प्रभागांमध्ये प्रत्येकी दहा लाख रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे कोपरगाव शहराच्या विकासात निश्चितच भर पडणार असून कोपरगाव शहराच्या विकासासाठी हा निधी आणला असून या पुढील काळात देखील शहराच्या विकासासाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे नितीनराव औताडे यांनी जाहीर केले.

जाहिरात
नगरविकास विभागातून मिळालेल्या या निधीतून शहराच्या प्रभाग क्रमांक १ शंकरनगर , प्रभाग क्रमांक ३ सुभद्रा नगर, प्रभाग क्रमांक ४ अन्नपूर्णा नगर बागुल वस्ती, प्रभाग क्रमांक ६, प्रभाग क्रमांक १०, प्रभाग क्रमांक११ गांधीनगर , प्रभाग क्रमांक १२, प्रभाग क्रमांक१४ बेट व ईतर प्रभागात २ ठिकाणी जॉगिंग ट्रॅक बसवण्यात येणार आहे. या जॉगिंग ट्रॅकचा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे . प्रत्येक प्रभागात जॉगिंग ट्रॅक साठी  प्रत्येकी १० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांचे कोपरगाव शहर शिवसेना, युवा सेनेच्या वतीने विमलताई पुंडे, अक्षय जाधव, अभिषेक आव्हाड, मनील नरोडे, विनोद गलांडे, मनोज राठोड, पवन गायकवाड, ज्ञानेश्वर कपिले आदींनी आभार मानले आहे.

जाहिरात
नितीनराव औताडे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे