के. जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न
के. जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न
के. जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑगस्ट २०२५–वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात असंख्य संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी सॉफ्ट स्किल सोबत टेक्निकल स्किल्स देखील आत्मसात करणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन सत्यम इन्स्टिट्यूट, मुंबईचे संचालक मा.तुषार सपकाळ यांनी येथे केले. स्थानिक के.जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य शाखा व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाणिज्य मंडळ उद्घाटन समारंभाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

या प्रसंगी कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा. संदीप मालुसरे म्हणाले की “डिजीटल मार्केटिंग व जी. एस. टी या क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी असून विद्यार्थ्यांनी त्या आत्मसात कराव्यात. तसेच इन्कम टॅक्सचे बारकावे देखील अभ्यासणे महत्त्वाचे आहे.”

वाणिज्य विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) संतोष पगारे यांनी पाहुण्याचे स्वागत करताना विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या कोर्सेसची माहितीही दिली. प्रो. (डॉ.) संजय अरगडे यांनी वाणिज्य मंडळाची ओळख व त्याद्वारे आयोजित उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. प्रा.हर्षदा पेडणेकर यांनी आभार प्रदर्शन तर डॉ. रविंद जाधव यांनी सूत्र संचालन केले. या कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.अजित धनवटे, प्रा.सुनील गुंजाळ, प्रा. स्वागत रणधीर, प्रा.सोनाली आव्हाड व प्रा.विजय सोमासे यांनी विशेष परिश्रम घेतले.



