आपला जिल्हा

विवेकभैय्या कोल्हे बुद्धिबळ स्पर्धेत धारणगावकर भगिनींचे मोठे यश

विवेकभैय्या कोल्हे बुद्धिबळ स्पर्धेत धारणगावकर भगिनींचे मोठे यश

विवेकभैय्या कोल्हे बुद्धिबळ स्पर्धेत धारणगावकर भगिनींचे मोठे यश
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ५ ऑगस्ट २०२५–  ग्रामीण भागातील खेळाडूंना मोकळे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडलेल्या विवेकभैय्या कोल्हे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोपरगावचे प्रज्ञा व विशाल धारणगावकर यांच्या तिन्ही मुलींनी मोठे यश संपादन करत नावलौकिक मिळवले आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ व रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्री संत जनार्दन स्वामी भक्तनिवास कोपरगाव येथे अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट सर्कल यांच्या मान्यतेने युवा नेते भैयाकोल्हे खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात आर्या विशाल धारणगावकर हिने द्वितीय क्रमांक तर श्रेया विशाल धारणगावकर हिने वय वर्ष ११ खालील वयोगटात प्रथम क्रमांक व नव्या विशाल धारणगावकर हिने सहभाग नोंदवत विशेष यश मिळवत गौरव संपन्न केला आहे.

जाहिरात
संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित विवेकभैय्या कोल्हे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदि जिल्ह्यातील स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या स्पर्धेत कोपरगावच्या धारणगावकर भगिनींनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून या सर्वांना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, संजीवनी महिला बचत गटाच्या रेणुका कोल्हे आदि मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले असून धारणगावकर भगिनींनी मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक व त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे