श्रीक्षेत्र कुंभारीला गंगागिरी महाराज सप्ताह देण्याची महंत रामगिरी महाराजांची ग्वाही
श्रीक्षेत्र कुंभारीला गंगागिरी महाराज सप्ताह देण्याची महंत रामगिरी महाराजांची ग्वाही
श्रीक्षेत्र कुंभारीला गंगागिरी महाराज सप्ताह देण्याची महंत रामगिरी महाराजांची ग्वाही

कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२५ – तालुक्यातील दक्षिणगंगा गोदावरी किनारी असलेल्या श्रीक्षेत्र कुंभारी गावाला २०२६ मध्ये होणारा १७९ वा सप्ताह सोहळा देण्याची महंत रामगिरी महाराज यांनी ३ ऑगस्ट रोजी देवगाव शनी येथे घेतलेल्या भेटी प्रसंगी राघवेश्वरानंद गिरी महाराज यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांना दिली.

सलग गेल्या तीन वर्षापासून गंगागिरी महाराजांचा सप्ताह सोहळा व्हावा म्हणून ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली जात आहे. महंत रामगिरी महाराजांनी दिलेल्या ग्वाहीनुसार तसे झाले तर संत परंपरेचा दीप कुंभारी या तीर्थक्षेत्री उजळला जाईल. योगीराज सद्गुरु गंगागीर महाराज यांचा १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा २०२६ साली कुंभारी ग्रामभूमीवर भाविकांच्या सहभागातून व्हावा ही गेल्या सलग ३ वर्षापासूनची मागणी असल्याची माहिती कुंभारी येथील महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी दिली. ३ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असणाऱ्या श्रीक्षेत्र देवगाव शनी येथे सुरू असलेल्या सप्ताहात श्री श्री १००८ राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी रामगिरी महाराज यांच्याकडे कुंभारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सप्ताह कुंभारी येथे होण्यासाठी मनापासून विनंती केली.

सप्ताह सोहळा होण्यासाठी ही मागणी नव्हे, ही आमच्या श्रद्धेची साद आहे. ही परंपरेची आठवण नाही, ही अध्यात्मिक ऊर्जेची पुनर्प्राप्ती आहे. कुंभारी गावाची संत संगतीसाठी तयारीसाठी ग्रामस्थ व भाविक भक्त आतुरलेले आहेत. हा सप्ताह सोहळा सर्व सुविधायुक्त होणार आहे. ऐतिहासिक पौराणिक धार्मिक परंपरा असलेल्या कोपरगाव तालुक्यात शतकानुशतके संतांनी या भूमीतून अध्यात्म भक्ती आणि संयमाचे बीज पेरले आहे. आता पुन्हा एकदा सप्ताह सोहळा मिळाल्यास ही भूमी संतांच्या पावन चरणांनी पावन होणार आहे. सप्ताहाच्या निमित्ताने कुंभारी गावात भक्तीभाव, नवचैतन्य आणि अध्यात्मिक शांतीचा नवा सूर अडवला जाईल. सोहळ्याची प्रतीक्षा फक्त श्रीक्षेत्र कुंभारीला नाही, तर तालुक्यातील माहेगाव, धारणगाव, सोनारी हिंगणी आणि मुर्शतपूर ही सारी गावे ही त्यासाठी तयार आहेत असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेले अखंड हरिनाम सप्ताह कुंभारी येथे सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या हस्ते ४४ वा सप्ताह १८९१ मध्ये, दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते ५९ वा सप्ताह १९०६ मध्ये कुंभारी येथे झालेला आहे तरी तिसऱ्या सप्ताहाची मागणी राघवेश्वरानंद गिरी महाराज व गावकरी परिसरातील गावे मागणी करत आहे.





