आपला जिल्हा

संजीवनी पॉलीटेक्निकच्या सर्व विभागांना सलग बारा वर्षांचे  एनबीए मानांकन  –  अमित  कोल्हे

संजीवनी पॉलीटेक्निकच्या सर्व विभागांना सलग बारा वर्षांचे  एनबीए मानांकन  –  अमित  कोल्हे

 सलग बारा वर्षे  एनबीए मानांकन प्राप्त महाराष्ट्रातील  एकमेव संस्था
जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १० ऑगस्ट २०२५संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागांचे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एनबीए), नवी दिल्लीने आऊटकम बेस्ड एज्युकेशन निकषांनुसार  मुल्यांकन करून पुढील तीन वर्षांसाठी  मानांकन बहाल केले. मेकॅट्रॉनिक्स विभागाला यापुर्वीच मानांकन प्राप्त झालेले आहे.   पॉलीटेक्निकचे सर्व विभाग सलग बारा वर्षे  एनबीए हे सर्वोच्च मानांकन प्राप्त  करणारे संजीवनी पॉलीटेक्निक हे महाराष्ट्रातील  एकमेव पॉलीटेक्निक ठरले आहे, तसेच भारतातील फार थोड्या संस्थांना अशा प्रकारचे सलबग बारा वर्षांचे  मानांकन आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी  अमित  कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

         संजीवनी पॉलीटेक्निकच्या या अभुतपुर्व उपलब्धीबाबत संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी चिफ टेक्निकल ऑफिसर  विजय नायडू, प्राचार्य ए. आर. मिरीकर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश जाधव, विभाग प्रमुख व डीन्स डॉ. किशोर जाधव, प्रा. इरफान सय्यद, प्रा. योगेश  जगताप, प्रा. गिरीश  वट्टमवार, प्रा. मोहिनी गुंजाळ, डॉ. गणेश जोर्वेकर,  प्रा. बाबासाहेब काकडे,  नानासाहेब लोंढे, प्रा. राहुल भाकरे, डॉ. दिपक पैठणकर, प्रा. संदीप पाटील, प्रा. गणेश चांगण, प्रा दिलिप पाटील, डॉ. संदीप सोनवणे, प्रा. अभिजीत पाबळे,  नानासाहेब कोल्हे यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

पत्रकात अमित कोल्हे यांनी म्हटले आहे की माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव  कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  सन २०१६ मध्ये प्रथमतः मुल्यांकनासाठी सामोरे गेले तेव्हापासुन एनबीएच्या कसोटीला सामोरे जाणारे संजीवनी पॉलीटेक्निक हे महाराष्ट्रातील  फार कमी संस्थांपैकी एक आहे.

जाहिरात

          एनबीए मानांकन प्राप्त सर्व विभागातील मागील तीन वर्षातील  प्रवेश  संख्या, उच्च विद्याविभूषित  व अनुभवी असणारे शिक्षक , विद्यार्थी-शिक्षक  प्रमाण, प्रथम वर्षात  प्रवेश घेतलेल्या  सलग तीन वर्षात  उत्तिर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांचे  प्रमाण, शिक्षकांनी  आधुनिक ज्ञानवृध्दीसाठी पुर्ण केलेले परीसंवाद, सादर केलेले शोधनिबंध व कार्यशाळांची संख्या, कन्सलटन्सी, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेले प्राविण्य, सुसज्य प्रयोगशाळा , नामांकित कंपन्यांशी  केलेले सामंजस्य करार, माजी विद्यार्थ्यांचे सध्या विविध कंपन्यांमधिल स्थान आणि संबधित कंपन्यांचा या विद्यार्थ्यांसंदर्भातील अभिप्राय, पालकांचा विभागांसंदर्भातील अभिप्राय, अशा  अनेक बाबींचा चढत्या कमानीचा अहवाल एनबीए कार्यालयाला सादर केला होता. विशेष  म्हणजे मागील तीन वर्षांमध्ये  सर्व विभागांच्या सर्व गरजु विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या  नामांकित कंपन्यांमध्ये मिळवुन देण्यात आल्या, या उपलब्धीची एनबीए समितीने विशेष दखल घेतली. एनबीए कार्यपध्दतीनुसार एनबीए समितीने या विभागाने सादर केलेल्या सर्व बाबींची पुराव्यासहीत परीमानांनुसार पडताळणी केली आणि भेटीनंतर लागलीच एका महिन्यात सर्व  विभागांना पुढील तीन वर्षांसाठी  एनबीए मानांकन  बहाल केल्याबाबतचे अधिकृत पत्र दिले. २०१६  ते २०२८ पर्यंत महाराष्ट्रातील ३७४ पॉलीटेक्निक पैकी संजीवनी पॉलीटेक्निक हे सर्व विभागांना सलग बारा वर्षे  एनबीए मानांकन असणारे एकमेव पॉलीटेेक्निक ठरले आहे.
              महाराष्ट्रातच  नव्हे तर संपुर्ण देशात  अनेक पॉलीटेक्निक आहेत. परंतु फार थोड्या  संस्था एनबीएच्या कसोट्यांना  सामोरे जाण्याचे धाडस करतात. मात्र महाराष्ट्राच्या  ग्रामिण भागातुन आत्मविश्वासाच्या  जोरावर २०१६ पासुन एनबीएच्या  कसोट्यांना  सामोरे जाण्याचे संजीवनी पॉलीटेक्निक धाडसी पावुल टाकित आहे.  सध्या आवुटकम बेस्ड एज्युकेशनच्या माणकाप्रमाणे तपासणी करण्यात येते. अतिशय कठीण मानके असलेल्या कसोट्यांना  संजीवनी पॉलीटेक्निक सामोरे गेले.  संजीवनी पॉलीटेक्निकने मानांकन  प्राप्त करून संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे श्री. कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे