श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता
श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता
सलग २१ वर्षांपासून अखंड सुरू आहे श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा

कोपरगाव विजय कापसे दि ११ ऑगस्ट २०२५– मुंबादेवी तरुण मंडळव सुवर्णकार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश तुळशीदास बागुल यांच्या सौजन्याने तसेच श्री संत जनार्दन स्वामी महाराज समाधीस्थान बेट कोपरगाव येथील महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभाशिर्वादाने गुरुवार दि ३१ जुलै पासून सुवर्णकार भवन सराफ बाजार कोपरगाव येथे संपन्न झालेल्या श्री श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि ८ ऑगस्ट रोजी सांगता झाली.

या प्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बोलतांना सांगितले की, आजच्या धावपळीच्या युगात मनाला शांती व स्वास्थ लाभण्यासाठी हा पारायण सोहळा करणे गरजेचे आहे.श्री सद्गुरू साईनाथ महाराज यांनी आपल्या तापोभूमीमध्ये वास्तव्य केलेले आहे. कोपरगाव शहर हे गोदावरी तीरावर असल्याने आपल्याला पौराणिक ऐतिहासिक तसेच साधू संतांचा सहवास आणि आशीर्वाद असलेली भूमी आहे.श्रद्धा आणि सबुरी आयुष्यात विश्वास आणि संयम आवश्यक सबका मालिक एक सर्व धर्म जात पंथ समान , मानव सेवा हीच ईश्वर सेवा गरजूंना मदत म्हणजे साई सेवा होय.

साई चरित्र सोहळा हा एक आध्यात्मिक अनुभव आहे तो साईबाबा शिकवणीचा प्रसार करणार आणि भक्तांना ईश्वराच्या अधिक जवळ येणारा भक्तिमार्ग असल्याचे सांगूत गेली ७ दिवस बसलेल्या सर्व पारायणार्थी महिला भगिनींचे आभार व्यक्त केले तर सदर प्रसंगी अतिशय सुंदर भजन सादर करणाऱ्या भजनी मंडळ महिला मंडळ तर उपस्थित सर्व भाविक भक्तांना मोठया प्रमाणावर प्रसादाचे आयोजन करणारे मुंबादेवी तरुण मंडळाचे योगेश बागुल यांचे आभार मानले.

या सोहळ्याला यशवंत विसपुते, तुळशीराम बागुल, प्रकाशराव भडकवाडे, उद्धव विसपुते, भाऊसाहेब बागुल, संजीवनी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, भाजपा माजी शहराध्यक्ष डी. आर. काले, भाजपा शहराध्यक्ष वैभवजी आढाव, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक विजयराव आढाव, बबलू वाणी, राजेंद्र बागुल, कैलास जाधव, संदीप देवकर, संजय जगदाळे, वैभव गिरमे, दीपक वाजे, आकाश वाजे, विजय चव्हाणके, रामचंद्र साळुंखे, विक्रमादित्य सातभाई, रंजन जाधव, ज्ञानेश्वर गोसावी, पप्पू पडियार, दत्तात्रय निकुंभ, संजय मंडलिक, सुनील लोणारी, नंदकुमार देवळालीकर, विनोद चोपडा, शुभम भावसार, कुणाल लोणारी, राहुल वडांगळे, निखिल जोशी, भैया बाविस्कर, ओम बागूल, प्रितेश जाधव, आदित्य लोणारी, तुषार जाधव,

साई नरोडे, राहुल आढाव तसेच पद्मावती बागुल, पौर्णिमा लोणारी, प्रतिभा कुलकर्णी, पूजा देवळालीकर, मोहिनी पवार, मनीषा अंभोरे, रूपाली आढाव, सुनिता घाडगे, अनिता मांडगे, राजश्री सोनवणे, वृषाली सोनवणे, हिराबाई वडनेरे, संगीता होन, सारिका उदावंत, संध्या भालेराव, शालिनी कोतकर, अनिता दर्पेल, वाणी काकू आदी मान्यवर उपस्थित होते.








