आपला जिल्हा

संदीप ढाकणे कोपरगावचा अभिमान- नारायण अग्रवाल

संदीप ढाकणे कोपरगावचा अभिमान- नारायण अग्रवाल

संदीप ढाकणे कोपरगावचा अभिमान- नारायण अग्रवाल

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ ऑगस्ट २०२५शहरातील सामाजिक संघटना नरसिंह प्रतिष्ठान ट्रस्ट व परमवीर ग्रुप यांच्या वतीने कोपरगावचे भूमिपुत्र संदीप गोरखनाथजी ढाकणे यांची महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील उपसचिव पदी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात पदोन्नती झाली. त्याबद्दल कहार गल्ली येथे त्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रसिद्ध व्यापारी नारायण अग्रवाल यांनी बोलताना सांगितले.

जाहिरात

 कहार गल्लीतील श्री.धनंजय कहार व गणेश लकारे यांनी या सत्कारा करता बरेच परिश्रम घेतले.

या प्रसंगी अग्रवाल यांनी पुढे बोलतांना सांगितले की, वाल्याचा-वाल्मिकी झालेले संदीप यांचे मोठे बंधू आदिनाथ ढाकणे हे माझे पूर्वीपासूनचे सहकारी गोदामाई प्रतिष्ठान हे त्यांचे काम उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांना अनेक पदे व मानसन्मान मिळाला आहे जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गोदामाई साफ-सफाई अभियान संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे.

जाहिरात

संदीप ढाकणे हे आदिनाथ ढाकणे यांचे लहान भाऊ अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. कहार गल्लीत राहणारे राहुल कहार यांचे ते वर्गमित्र अगदी लहान असताना त्यांच्या घरी येणे जाणे होते. ढाकणे यांच्या घरची परिस्थिती हालक्याची असताना कहार कुटुंबियांनी त्यांना खूप जीव लावला. राहुल कहार यांची बहीण दरवर्षी राखी पौर्णिमेला संदीप ला राखी बांधायची काल योगायोगाने रक्षाबंधन सण होता. त्यामुळे त्यांच्या बहिणीने संदीप ढाकणे यांना राखी बांधून ओवाळले, ३५ वर्षानंतर चा हा प्रसंग सर्वांचे मन हालवून गेला. चित्रपटाच्या कथेप्रमाणे सर्व प्रसंग डोळ्यापुढे उभे राहिले.

आज कोपरगावात संजीवनी अकॅडमी, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज, समता इंटरनॅशनल, आत्मा मालिक स्कूल, जनार्दन स्वामी स्कूल, महानुभव यांचे लॉ कॉलेज व नर्सिंग कॉलेज , बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था आदी एक शैक्षणिक शैक्षणिक संस्था असून आज संजीवनी पॉलिटेक्निकल कॉलेज यांना सलग बारा वर्ष मानांकन मिळाले आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे एकमेव कॉलेज आहे. संजीवनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या वतीने हजारो मुलांना २५ ते ३० लाख वर्षाचे पॅकेज प्लेसमेंट द्वारे दिले जाते, हे कोपरगावकरांना आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.

जाहिरात

संदीप ढाकणे यांच्या बोलण्यातून आपल्या शहरात शैक्षणिक वातावरणात बऱ्याच त्रुटी आहे.पूर्वी अकरावी, बी.ए ,बी.कॉम असे शिक्षण झाले म्हणजे शिक्षण झाले,असे समजत पण आता उच्च शिक्षण ही काळाची गरज झाली आहे.
बाजारतळ,कहार गल्ली,शिवाजी रोड येथे प्रचंड दाट लोकसंख्या आहे. पण दुर्दैवाने आज लहान-लहान विद्यार्थ्यांना येथे शैक्षणिक वातावरण मिळत नाही. हे कटू पण सत्य आहे. ज्यांना शक्य असेल पालकांनी आपल्या मुलांना घरामध्ये अभ्यासची योग्य ती जागा उपलब्ध करून द्यावी. कॉम्पुटर,लॅपटॉप आदींचे शिक्षण द्यावे. लहान मुलांना वाचनाची आवड लावावी. जो आज वाचन तोच पुढे शिकेल, आज सुदैवाने कोपरगाव नगरपालिका इमारतीत समताने स्टडी पॉईंट चालू केला आहे. महात्मा गांधी प्रदर्शन व स्व.सूर्यभानजी पाटील वहाडने घाट येथे सुद्धा विद्यार्थी अभ्यासाला येतात असे माझ्या पाहण्यात आले आहे.

जाहिरात

इतर उपस्थित मान्यवरांनी देखील दोन-चार स्टडी पॉईंट शहरात चालू करावे. विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण मिळावे याकरता आठ-दहा दिवसातून एक मार्गदर्शन शिबिर घ्यावे. लहान विद्यार्थ्यांना आतापासूनच पद,पैसा,भाई,नेता,ढोल-ताशे यापासून दूर ठेवावे.

यातूनच नवीन पिढी घडेल आणि असे संदीप ढाकणे सारखे दोन-चार यशस्वी विद्यार्थी तरी नवीन तयार होतील, या सत्काराच्या मागचा हा उद्देश थोडाया फार प्रमाणात यशस्वी होईल असे वाटते. यू.पी.एस.सी,एम.पी.एस.सी अशा अनेक स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केंद्र कोपरगावात सुरू व्हावे. म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गक्रमण करण्यास सोपे जाईल.

असे बोलून अग्रवाल यांनी पुन्च्छ एकदा .संदीप ढाकणे यांचे अभिनंदन करत तालुक्यातील गोर गरीब मुलांना त्यांचे मार्गदर्शन नेहमी लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे