जयश्री सांगळे यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी निवड
जयश्री सांगळे यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी निवड
जयश्री सांगळे यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी निवड

कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑगस्ट २०२५–कोपरगांव शहर व विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे पुर्व -पश्चिम मंडलातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, पॅरंट बॉडी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अनुसुचित जाती मोर्चा, अनुसुचित जमाती मोर्चा, अल्पसंख्यांकासह सर्व सेलच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा नियुक्त्या करण्यात आल्या असून यात कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथील जयश्री अनिल सांगळे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बीपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि १३ ऑगस्ट रोजी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर झालल्या कार्यक्रमात कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते नियुक्ती करण्यात आली आहे.

जयश्री सांगळे या कोल्हे गटाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा सोनारी गावचे माजी सरपंच धोंडीबा कारभारी सांगळे यांच्या सुनबाई व अहिल्यानगर जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल धोंडीबा सांगळे यांच्या पत्नी असुन त्या स्थानिक बचतगटा मध्ये सक्रिय आहे.



